आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Tweaks Internal Poll Rules After 5 MPs' Letter | Candidates To Get List Of 9000 Delegates | Marathi News

काँग्रेसने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बदलले नियम:उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीला 9 हजार प्रतिनिधींची यादी मिळणार

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील महिन्यात होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना इलेक्टोरल कॉलेजमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 9 हजार प्रतिनिधींची यादी पाहण्यास मिळेल. ही यादी 20 सप्टेंबरपासून पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडे उपलब्ध होईल.

पाच नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती
शशी थरूर, कार्ती चिदंबरम, मनीष तिवारी यांच्यासह पाच काँग्रेस खासदारांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे.

अलीकडच्या काही दिवसांत काँग्रेसमधून अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत, अशा स्थितीत उर्वरित नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष हायकमांडने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

मधुसूदन मिस्त्री यांनी पत्र लिहून उत्तर दिले
पाच नेत्यांना लिहिलेल्या पत्रात मधुसूदन मिस्त्री यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नेत्यांना त्यांच्या प्रदेश काँग्रेस कार्यालयात राज्यातील 10 प्रतिनिधींची यादी पाहता येईल. उमेदवारी अर्ज दाखल करून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द होताच नेत्यांना प्रतिनिधींची संपूर्ण यादी मिळेल.

मधुसूदन निस्त्री म्हणाले की, जर एखाद्या नेत्याला वेगवेगळ्या राज्यातून 10 समर्थकांची उमेदवारी मिळवायची असेल तर 20 सप्टेंबरनंतर काँग्रेसच्या दिल्लीतील माझ्या कार्यालयात सर्व 9 हजार प्रतिनिधींची यादी उपलब्ध असेल. उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुक नेते या यादीतून त्यांचे 10 समर्थक निवडू शकतात आणि त्यांची स्वाक्षरी करून पाठिंबा मिळवू शकतात. त्यानंतर 24 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल.

काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीच मतदान यादीची मागणी केली आहे
याआधीही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि असंतुष्ट G-23 नेत्यांचे सदस्य मनीष तिवारी यांनी काँग्रेस संघटना निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, मतदान यादीशिवाय काँग्रेस अध्यक्षपदासाठी निष्पक्ष निवडणुका कशा होतील? निष्पक्ष निवडणुकांसाठी पक्षाच्या मतदाराचे नाव आणि पत्ता प्रसिद्ध करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तिवारी यांनी मिस्त्री यांना सांगितले होते की, मतदान पारदर्शक पद्धतीने काँग्रेसच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जावे. ते म्हणाले होते की, निष्पक्ष निवडणुकीची पहिली अट म्हणजे मतदारांची नावे आणि पत्ते उघड झाले पाहिजेत. पक्षाचे नेते शशी थरूर आणि कार्ती चिदंबरम यांनीही या विषयावर बोलले आहे.

बातम्या आणखी आहेत...