आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Vs Baba Ramdev Cotroversy | Abhishek Manu Singhwi Tweet Over Yoga, Abhishek Manu Singhwi, Baba Ramdev, International Yoga Day, PM Modi, Narendra Modi; News And Live Updates

योगावर राजकारण:ॐ म्हटल्याने योग सामर्थ्यशाली होणार नाही - सिंघवी; योगा करा, तुम्हा सर्वांना एकच देव दिसेल - रामदेव

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिला योग दिवस 2015 मध्ये साजरा करण्यात आला

आज एकीकडे संपूर्ण जगात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाच्या पार्श्वभूमीवर सकाळी साडे सहा वाजता देशातील जनतेला संबोधित केले. परंतु, देशात योगावरुन राजकारण सुरु झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्या ट्विटने वाद निर्माण झाले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'ॐ म्हटल्याने ना योग सामर्थ्यशाली होईल किंवा अल्लाहचे नाव घेतल्याने नाही योगाची शक्ती कमी होईल.'

यावर प्रत्युत्तर देताना योगगुरु रामदेव यांनी म्हटले की, 'ईश्वर अल्ला तेरो नाम सबको संमती दे भगवान' म्हणजेच अल्ला, देव सर्व एकच आहेत. त्यामुळे तर 'ओम' म्हणायला काय हरकत आहे? यामध्ये प्रत्येकाला फक्त एकच देव दिसेल. त्यामुळे योग करायला हवे.

कोरोना महामारीतील दुसरा योग दिवस
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी योग दिवस हे कोरानाचे बंधन पाळत साजरा करावे लागणार आहे. गेल्या वर्षी 6 वा आंतरराष्ट्रीय योग दिवसदेखील असाच साजरा करण्यात आला होता. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाने 'योग फॉर हेल्थ-योग फ्रॉम होम' अशी थीम ठेवली होती. या योग दिवसावरदेखील मास्क, सोशल डिस्टेन्सिंग ठेवत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आला आहे.

पहिला योग दिवस 2015 मध्ये साजरा करण्यात आला
जगातील पहिला योग 21 जून 2015 मध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राजपथवरुन सुमारे 35 हजार 985 लोकांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे 21 योगासने केली.

बातम्या आणखी आहेत...