आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Will Continue To Sit In Opposition For Next 50 Years If Election Doesn't Happen In Party Says Ghulam Nabi Azad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसमध्ये कलह सुरूच?:काँग्रेसमध्ये प्रमुख पदांवर निवडणूक घेतली नाही तर 50 वर्षे विरोधीपक्षातच बसून राहावे लागेल - गुलाम नबी आझाद

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आझाद म्हणाले - जे लोक निवडणुकीला विरोध करत आहेत त्यांना पद जाण्याची भीती
  • 3 दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस बैठकीमध्ये आझाद आणि राहुल गांधींमध्ये वाद झाल्याचे वृत्त होते

राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा काँग्रेस वर्किंग कमिटी आणि संघटनेच्या प्रमुख पदांच्या निवडणुका घेण्यावर जोर दिला आहे. आझाद गुरुवारी म्हणाले , 'निवडूण आलेल्या लोकांनी नेतृत्त्व केले तर चांगले होईल, अन्यथा काँग्रेस पुढचे 50 वर्षे विरोधीपक्षातच बसून राहिल. असेही असू शकते की, नियुक्त केल्या जाणाऱ्या अध्यक्षाला 1% लोकांचेही समर्थन नसेल.'

'निष्ठावान असल्याचा दावा करणारे निकृष्ठ राजकारण करत आहेत'
आझाद यांनी कॉंग्रेस कार्यकारी समितीसह राज्यांच्या प्रमुख, जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्षांच्या निवडणुका घेण्याचा आग्रह धरला. त्याचबरोबर, "ज्यांना निवडणुका घेण्यास विरोध आहे, त्यांना आपली पदे गमावण्याची भीती आहे. जे लोक निष्ठावान असल्याचा दावा करतात ते वास्तवात निकृष्ठ राजकारण करत आहेत. यामुळे पक्षाचे आणि देशाचे नुकसान होईल."

'अंतर्गत निवडणूकीत 51% मते मिळवणाऱ्याचा विजय होईल. याचा अर्थ असा आहे की निवडलेल्या अध्यक्षांसह 51% लोक असतात. जर कॉंग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य निवडणुकीतून निवडले गेले तर त्यांना काढून टाकता येणार नाही. यात प्रॉब्लम काय आहे?'

'नवीन अध्यक्षांसाठी मी 6 महिने थांबू शकतो'
'राहुल गांधी पुढचे अध्यक्ष बनतील किंवा इतर कुणाला जबाबदारी देण्यात येईल. मला कोणतीही समस्या नाही. सोनिया गांधी यांनी प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्तावित समितीचे सदस्य केले तर मला आनंद होईल. नवीन कॉंग्रेस अध्यक्षाची मी 6 महिने प्रतिक्षा करु शकतो'

कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीनंतर 3 दिवसानंतर आझाद यांचे हे विधान आले आहे. सोमवारी झालेल्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत ठराव संमत करण्यात आला. यामध्ये सोनिया गांधींना आवाहन करण्यात आले की, जोपर्यंत अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) अधिवेशन बोलावण्याची परिस्थिती येत नाही, तोपर्यंत तुम्हीच अंतरिम अध्यक्ष राहा.

आझाद म्हणाले होते- राहुल यांचे आरोप सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन
पक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत बदल करण्याची मागणी करणाऱ्या आणि सोनिया गांधी यांना पत्र लिहणार्‍या 23 नेत्यांपैकी आझाद हे एक नेते आहेत. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राहुल गांधींनी नेत्यांविरोधात भाजपशी मिळून पत्र लिहिल्याचा आरोप केला होता. आरोप सिद्ध झाल्यास ते पक्ष सोडून देतील, असे आझाद यांनी म्हटले होते. मात्र, नंतर राहुल यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, मी असे काही बोललोच नाही.