आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Will Not Be Free Of Gandhi, Only Rahul Gandhi Can Become President Early Next Year, Some Leaders Want To Be President Of Non Gandhi Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसमधील कलहाची इनसाइड स्टोरी:गांधीमुक्त होऊ शकणार नाही काँग्रेस, पुढील वर्षाच्या सुरुवातीला राहुल गांधीच बनू शकतात अध्यक्ष, बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष असावा अशी काही नेत्यांची इच्छा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या व्हर्चुअल बैठकीत पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. राहुल गांधींच्या कथित वक्तव्याचा गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी तातडीने विरोध केला. त्यानंतर साडेचार तासात पक्षाने सावरसावर करत वादवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण या भांडणा मागची कहाणी थोडी वेगळी आहे. पुढे काय होणार आहे हे देखील जवळजवळ निश्चित आहे. या घटनाक्रममुळे काही प्रश्नही उद्‌भवत आहेत. त्यांना 6 पॉइंटमध्ये मुद्देसुदपणे समजून घेऊयात...

1. पत्र कोणत्या दिशेने इशारा करते?

हे पत्र अप्रत्यक्षपणे इशारा करते की, एका पक्षाच्या गटाला बिगर गांधींचे नेतृत्त्व हवे होते. राहुलचा मार्ग रोखण्याचा त्यांचा हेतू होता. त्याची कथा सुमारे 15 दिवसांपूर्वी सुरू झाली. वास्तविक, सोनिया गांधी यांचा अंतरिम अध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ 9 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला होता. त्यापूर्वी दोन दिवस आधी 7 ऑगस्ट रोजी कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. हे पत्र अशा वेळी लिहिले गेले होते जेव्हा सोनिया यांना गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या पत्रामध्ये नेत्यांनी सोनिया गांधींकडे 'फुल टाइम लीडरशिप'ची मागणी केली होती. जो 'फील्डमध्ये अॅक्टिव्ह राहतील आणि त्याचा परिणामही दिसेल' काँग्रेसचे सूत्र सांगतात की, फुलटाइम लीडरशिल आणि फील्डमध्ये प्रभाव दाखवणाऱ्या अॅक्टिव्हनेस सारख्या शब्दाचा वापर राहुल गांधींना अध्यक्ष करु नका याकडे इशारा करतो. म्हणजे काँग्रेसमधील एका गटाला वाटते की, राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनू नये.

2. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत काय झाले?

23 नेत्यांचे पत्र असूनही सोनिया गांधी यांनी 12 ऑगस्ट रोजी पक्षाला पत्र लिहून पुढील अध्यक्ष निवडण्यासाठी कारवाई करण्यास सांगितले. दुसर्‍या गटाच्या नेत्यांना समजले की सोनिया सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राजीनामा देतील आणि लोकसभा निवडणुकांमधील अपयशानंतर अध्यक्षपदाचा राजिनामा दिलेल्या राहुल यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होईल. कोणत्याही परिस्थितीत या बैठकीत राहुल यांच्या डोक्यावर अध्यक्षपदाचा मुकुट असावा अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यांना यातही यश आले आणि हे प्रकरण सहा महिन्यांकरिता लांबणीवर पडले.

सीडब्ल्यूसीची सोमवारी बैठक झाली होती आणि दोन दिवसांपूर्वीच शनिवारी 23 नेत्यांचे पत्र लीक झाले. सोमवारी बैठक सुरू झाली तेव्हा राहुल यांनी थेट या पत्राच्या वेळेवर प्रश्न केला. ते म्हणाले की, जेव्हा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हाच हे पत्र का लिहिले गेले? प्रत्यक्षात राहुल म्हणाले होते की अशी पत्रे लिहिल्यास भाजपाला फायदा होऊ शकतो. माध्यमांमध्ये ही गोष्ट लीक होत असताना राहुल सांगत आहेत की, पक्षाच्या नेत्यांनी हे भाजपसोबतच्या मिलीभगतने असे केले आहे.

'भाजपाला फायदे' हे विधान म्हणजे 'भाजपाची मिलीभगत' असल्याचे मानत दोन नेत्यांनी याचा उघडपणे विरोध दर्शविला. पहिले गुलाम नबी आझाद आणि दुसरे कपिल सिब्बल. सिब्बल यांनी सर्वप्रथम ट्विट केले, त्यानंतर राहुल यांच्यासोबत त्यांचे बोलणे झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले. तर आझाद यांनी राहुल यांचे आरोप सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ असे सांगितले असल्याचे बोलले जाते. नंतर त्यांनी हे विधान मागे घेतले.

3. नेत्यांनी अचानक विधान मागे का घेतले?

आता प्रश्न उपस्थित होतो की, राहुल गांधींनी हे वक्तव्य केले या विषयी पक्षातील नेत्यांना ठोस माहिती नव्हतीच तर मग त्यांनी सार्वजनिकरित्या नाराजी का दर्शवली? खरंतर सीडब्ल्यूसीच्या बैठकीमध्ये 51 नेते सामिल झाले होते. मात्र यामध्ये सोनियांना चिठ्ठी लिहिणाऱ्या नेत्यांमधील केवळ 4 लोक उपस्थित होते. इतर नेते सीडब्ल्यूसीच्या बैठकीमध्ये पूर्ण तयारीनिशी आले होते आणि त्यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना बॅकफूट केले.

काँग्रेसचे सूत्र सांगतात की, पक्षातील फूट रोखण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलनुसार या नेत्यांना आपले विधान परत घेण्यास सांगण्यात आले. अंबिका सोनी सारख्या काही नेत्यांनी सोनिया गांधींकडे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली होती.

4. अखेर सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना अडचण काय?

पत्र लिहिणारे नेते हे मोठ्या पदांवर राहिले आहेत. गुलाम नबी आझार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि राज्यसभेत विरोधीपक्ष नेता आहेत. राज्यसभेतील त्यांचा कार्यकाळ पुढच्यावर्षी पूर्ण होणार आहे. असे मानले जात आहे की, त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवले जाणार नाही. आनंद शर्मांचीही परिस्थिती अशीच आहे.

सोनिया यांना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भूपिंदर सिंह हुड्डा हरियाणा, राजिंदर कौर भट्टल पंजाब, एम वीरप्पा मोइली कर्नाटक आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे पंतप्रधान राहिले आहेत. सिब्बल यूपीए सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर राहिले आहेत. असे मानले जाते की, या वरिष्ठ नेत्यांना पुन्हा राहुल गांधी अध्यक्षपदी नको आहेत. पक्षामध्ये त्यांचे महत्त्व कमी होण्याची चिंता आहे कारण राहुल गांधींना नव्या पीढीला पुढे आणायचे आहे.

यामधील अनेक त्यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा आहे. जर राहुल गांधी अध्यक्ष बनले तर त्यांना राज्यसभेत पुन्हा जाण्याची शक्यता नसू शकते. काहींना त्यांच्या मुलांच्या राजकीय करिअरची चिंता आहे.

5. अध्यक्षपदाचे पुढे काय होईल?
सोनिया गांधी सध्या अंतरिम अध्यक्षा राहतील. काँग्रेसच्या सूत्रांनुसार पुढच्या वर्षीच्या सुरुवातीच्या काळात पंजाब किंवा छत्तीसगढमध्ये अखिल भारतीय काँग्रेस किमिटीचे सत्र होईल. यामध्ये राहुल गांधींची पुन्हा अध्यक्षपदी निवड करणे हे ठरलेले आहे.

6. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांचे काय होणार?

सीडब्ल्यूसीच्या 7 तास सुरू असलेल्या बैठकीनंतर जो प्रस्ताव पारित करण्यात त्याची भाषा ही इशारा देणारी आहे. सोनिया पत्रामुळे किती दुखावल्या आहेत याचे संकेत प्रस्तावच्या भाषेवरुन स्पष्ट होते. यामध्ये म्हटले आहे की, 'सीडब्ल्यूसीला हे स्पष्ट करून सांगायचे आहे की कोणालाही पक्ष किंवा त्याचे नेतृत्व कमकुवत करण्यास किंवा दुर्बल करण्यास परवानगी दिली जाणार नाही.'

राहुल यांना बळकटी देत म्हटले गेले की, 'राहुल गांधी सरकारविरूद्ध आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. सीडब्ल्यूसीला प्रत्येक प्रकारे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करायचे आहेत. '

असे मानले जात आहे की, राहुल यांची निवड करण्यापूर्वी सोनिया यांना पत्र लिहिलेल्या बहुतेक नेत्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनाही याची जाणीवही आहे. या कारणास्तव, काल सीडब्ल्यूसीच्या बैठकीनंतर तातडीने पाच-सहा नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी पोहोचले होते.