आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अर्णव गोस्वामी यांच्या चॅट प्रकरणावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अर्णव गोस्वामींवर निशाना साधला. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला, अशा शब्दांत सोनिया गांधींनी टीकास्त्र सोडले.
सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्यकारी समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामींचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. 'मागील काही दिवसांत धक्कादायक बातम्या वाचल्या. राष्ट्रीय सुरक्षेशी कशा पद्धतीने खेळल्या जात आहे, हे आपण पाहिले. जे लोक दुसऱ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्रे देत होते. त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय आहे. गेल्या काही दिवसात गोपनीय माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगले आहे', असा हल्लाबोल तांनी यावेळी केला.
काँग्रेसमधील एका गटाची मागणी- अध्यक्ष पुर्णवेळ आणि सक्रीय असावा
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधीं पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष झाल्या. दरम्यान, काँग्रेमधील एका गटाची मागणी आहे की, पक्षाचा अध्यक्ष हा पुर्णवेळ आणि सक्रीय असावा. याशियाव बिगर गांधी व्यक्तीला अध्यक्ष बनवण्याची मागणीदेखील केली जात आहे.
सोनिया गांधींनी मागच्या महिन्यात नाराज नेत्यांची भेट घेतली होती
काँग्रेसच्या 23 जेष्ठ नेत्यांनी मागच्या वर्षी सोनिया गांधींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. यात त्यांनी पक्षांतर्गत बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आजाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपिंदर सिंह हुड्डा, मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. या नाराज नेत्यांसोबत सोनिया यांनी मागच्या महिन्यात बैठक घेतली होती. त्या बैठकीला राहुल आणि प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.