आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Working Committee Meeting: Assembly, Organizational Elections Will Also Be Discussed

नवी दिल्ली:काँग्रेस कार्यसमितीची बैठक : विधानसभा, संघटनात्मक निवडणुकीवरही होणार मंथन

नवी दिल्ली / मुकेश कौशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस कार्यसमितीची बहुप्रतीक्षित बैठक शनिवारी होणार आहे. त्यात पक्ष संघटना, राज्यांच्या राजकारणात सुरू असलेले घमासान आणि विद्यमान राजकीय स्थितीवर विचारमंथन होण्याची शक्यता आहे. लखीमपूर खिरी येथील घटनेच्या आधारावर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा विचार केला जाऊ शकतो.

सूत्रांनुसार, पंजाबमध्ये नेतृत्व बदलापूर्वी व नंतर झालेल्या फजितीनंतर पक्षातील असंतुष्ट नेत्यांनी बंडखोरीचे सूर तीव्र केले होते. तथापि, लखीमपूर खिरी प्रकरण व त्यानंतर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी केलेल्या विरोधामुळे गांधी परिवाराचा प्रभाव पुन्हा एकदा मजबूत झाला आहे. यामुळे कार्यसमितीच्या विरोधातील सूरही नरमले आहेत. असंतुष्ट फळीतील एका नेत्याने सांगितले की, ‘आम्ही संघर्षाच्या मानसिकतेत नाही. बैठकीत रचनात्मक सूचना घेऊन जाऊ. मे २०२२ पूर्वी यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड विधानसभा निवडणुका आहेत. पक्ष या निवडणुकांत चांगली कामगिरी करेल, असे आम्हाला अपेक्षित आहे. त्यादृष्टीने पक्षाची सुस्पष्ट रणनीती तयार व्हावी. पंजाबमध्ये पक्षाला सरकार वाचवायचे आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या वापसीची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष मोठा डाव खेळत आहे. मणिपूर आणि गोव्यातही काँग्रेस स्पर्धेत आहे.

पक्षाध्यक्ष निवड विधानसभा निवडणुकीपर्यंत लांबणार
बैठकीची घोषणा करतानाच कार्यसमितीत सल्लामसलत होईल हे स्पष्ट करण्यात आले होते. सूत्रांनुसार, पक्षाध्यक्ष निवडीचा निर्णय विधानसभा निवडणुकीपर्यंत टाळला जाऊ शकतो. परंतु असंतुष्टांच्या फळीची मागणी पाहता निवडणूक प्रक्रियेची एक रूपरेषा सादर केली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...