आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Working Committee Meeting Congress Leaders Kapil Sibal And Ghulam Nabi Azad Angered By Rahul Gandhi's Remarks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसमध्ये वादंग:राहुल गांधींवर भडकलेल्या कपिल सिब्बल यांनी डिलीट केलं 'ते' ट्विट, नवं ट्विट करत म्हणाले...

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमध्ये जोरदार वादंग सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये सध्या सुरू आहे. यात मोठा गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते हे आता राहुल गांधींवर नाराज असल्याचे दिसत आहे. दरम्यान कपिल सिब्बल यांनी ट्विट करत राहुल गांधींवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आता काहीच वेळात त्यांनी हे ट्विट डिलीट करत सारवासारव केली आहे.

नव्या ट्विटमध्ये सिब्बल म्हणतात...

राहुल गांधीविरोधातलं 'ते' आक्रमक ट्विट सिब्बल यांच्याकडून काही मिनिटांत डिलीट करण्यात आलं आहे. आता दुसररं ट्विट करत सिब्बल म्हणतात की, 'राहुल गांधी यांनी थेट माझ्याशी संवाद साधला आहे. माध्यमांमध्ये दाखवलं जाणारं विधान आपण केलंच नसल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे मी माझं ट्विट मागे घेत आहे,' असं सिब्बल यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं.

कपिल सिब्बल यांनी केलं होते 'हे' ट्विट

कपिल सिब्बल यांनीही ट्विट करत राहुल गांधींच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. सिब्बल म्हणाले की, 'आम्ही भाजपाशी संगनमत केलं असल्याचं राहुल गांधी म्हणाले. मग राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली. गेल्या 30 वर्षांमध्ये भाजपाच्या पथ्यावर पडेल, असं एकही विधान मी केलेलं नाही. तरी आम्ही भाजपाची हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातं,' अशा शब्दांमध्ये कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींवर नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

सोनिया गांधी यांनी या बैठकीत अंतरिम अध्यक्षाचे पद सोडण्याची मागणी केली. यापूर्वी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पत्र पाठवत पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची मागणी केली होती. यावर आता सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवले?असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. तसेच पत्राच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थिती केले. राहुल गांधींनी पक्षांच्या नेत्यांनी आरोप केले होते की, हे सर्व भाजपच्या मिलीभगतमुळे होत आहे. राहुल गांधींनी हे वक्तव्य करुन 20-25 मिनिट झाल्यानंतर लगेच त्यांचा विरोध करण्यास सुरुवात झाली आहे.

राहुल गांधींवर भडकले गुलाम नबी आझाद
राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांवर प्रश्न उपस्थित केल्यावर जेष्ठ नेते हे त्यांच्यावर भडकले. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर थोड्याच वेळात राज्यसभेचे विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, जर भाजपासोबत आमची मिलीभगत असल्याचा राहुल गांधींचा आरोप सिद्ध झाला तर मी राजीनामा देईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser