आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Congress Working Committee Meeting News And Updates Sonia Gandhi, Rahul Gandhi, Congress

काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार?:काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सहमती दर्शवली; नवीन पक्षाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • अशोक गहलोत, अमरिंदर सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींवर विश्वास व्यक्त केला
 • सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट रोजी अंतरिम अध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला

सोमवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. सोनिया म्हणाल्या की, नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी सुरू करा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ज्येष्ठ नेते ए.के. अॅटनी यांनी त्यांना पद सोडू नये अशी विनंती केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही ही बैठक होत आहे.

सोनिया गांधींनी नवीन अध्यक्ष शोधण्यास सांगितले

मीडिया रिपोर्ट्स नुसार, सोनिया गांधींनी पक्षाच्या नेत्यांना नवीन अध्यक्ष शोधण्यास सांगितले आहे. तर वेगवेगळ्या काळात जवळपास 20 वर्षे त्या या पदावर राहिल्या आहेत. दरम्यान काँग्रेसने सोनिया गांधींचे राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. राहुल गांधींनी यापूर्वी पक्षाचा अध्यक्ष होण्याच्या जबाबदारीस नकार दिला आहे.

निवडणुकांमधील अपयशानंतर दिला होता राजीनामा

2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या झालेल्या पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा सोनिया गांधींनी ऑगस्टमध्ये एका वर्षासाठी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. या वर्षी 10 ऑगस्टला त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. गेल्या सीडब्ल्यूसी बैठकीमध्ये त्यांना पक्षाची जबाबदारी सांभाळण्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, त्यांनी पक्षाचे नेतृत्त्व करण्यात कोणताही रस नाही.

बैठकीमध्ये पक्षासमोर आहेत 4 पर्याय

 1. सोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष कायम राहतील. अध्यक्षाच्या निवडीसाठी निवडणुक प्रक्रियेची घोषणा करता येऊ शकते.
 2. राहुल गांधी पक्षाचे प्रमुख बनेपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातून गैर गांधी वरिष्ठ नेत्याला अध्यक्ष बनवण्यात यावे. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि मुकुल वासनिक यांचे नाव चर्चेत आहे.
 3. राहुल गांधींना अध्यक्ष होण्यास तयार करण्यात यावे. असेही सीडब्ल्यूसीला तांत्रिकदृष्ट्या त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. राहुल गांधींना पक्षात व्यापक फेरबदल करण्याचे अधिकार देण्यात येऊ शकतात.
 4. अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाचा प्रस्ताव येऊ शकतो. असे मानले जात आहे की, पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल अध्यक्षासाठी राहुल गांधींचे नाव पुढे करु शकतात. जर कार्यसमिती निवडणुकीचा निर्णय घेत असेल तर मुद्दा तेथेच संपू शकतो.

बदलाची मागणी का केली जातेय?

 • पक्षाचा आधार कमी होत आहे: 2014 च्या निवडणुकीत सोनिया गांधी अध्यक्ष होत्या. या निवडणुकीत कॉंग्रेसला आपल्या इतिहासातील सर्वात कमी 44 जागा मिळू शकल्या. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी अध्यक्ष होते. पक्षाला केवळ 52 जागा जिंकता आल्या.
 • कॅडर कमकुवत झाला: देशात कॉंग्रेसचे कॅडर कमकुवत झाले आहेत. 2010 पर्यंत, सदस्यांची संख्या चार कोटी होती, आता ती कमी होऊन एक कोटींपेक्षा कमी झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मणिपूरसह इतर राज्यात कॉंग्रेसमधील नेत्यांच्या भूमिकेचा प्रभाव पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झाला आहे.
 • 6 राज्यांमध्ये काँग्रेस सरकार: छत्तीसगड, पद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार सध्या आहे. ज्योतिरादित्य सिंधियाच्या बंडखोरीनंतर मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार पडले.

अध्यक्षपदाबाबत पक्षात भिन्न मते

 • राहुल गांधींच्या बाजूने: सलमान खुर्शीद रविवारी म्हणाले, 'अंतर्गत निवडणुकांऐवजी प्रत्येकाची संमती पाहिली पाहिजे. राहुल यांना कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सध्या गांधी परिवाराने पक्षाची सत्ता हाती घ्यावी. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही राहुल गांधींवर विश्वास व्यक्त केला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, राहुल यांनी पुढे येऊन पक्षाचे नेतृत्व केले पाहिजे.
 • पक्षात बदल होण्याच्या बाजूने: गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी आणि शशी थरूर यांच्यासह 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील मोठ्या बदलांवर भर दिला. ते म्हणाले - नेतृत्व पूर्णवेळ (पूर्ण वेळ) आणि प्रभावी असले पाहिजे, जे या क्षेत्रात सक्रिय असले पाहिजे. त्याचा परिणामही दिसायला हवा. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणुका घेण्यात याव्यात. संस्थेत नेतृत्व करणारी यंत्रणा त्वरित तयार करण्यात यावी. जेणेकरून पक्षाला पुनरुज्जीवन करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. मात्र, त्यांनी असे लिहिले नाही की कॉंग्रेस अध्यक्ष हे बिगर गांधी कुटुंबातील असावेत.