आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवीन अध्यक्षासाठी काँग्रेस वर्किंग कमेटीने सोमवारी बैठक बोलावली होती. 7 तास चाललेल्या या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार सोनिया गांधींकडेच असेल हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी. सोनिया गांधींनी बैठकीच्या सुरुवातीला हंगामी अध्यक्षपद सोडण्याची इच्छा जाहीर केली होती, तरीदेखील पक्षाने त्यांच्याकडेच ही जबाबदारी ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू, येत्या सहा महिन्यात नवीन अध्यक्ष निवडला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर गोंधळ, पक्षाने चार तासात केला डॅमेज कंट्रोल
पक्षाची सर्वात मोठी संस्था काँग्रेस वर्किंग कमेटी म्हणजेच सीडब्ल्यूसीची सोमवारी बैठक सुरू झाली, तेव्हा सोनिया गांधींनी हंगामी अध्यक्षपद सोडण्याची इच्छा जाहीर केली. यानंतर माजी अध्यक्ष राहुल गांधींनी सोनिया यांना पाठवलेल्या पत्राच्या टायमिंगवरुन प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधंनी काँग्रेसच्या नेत्यांवर भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप केला. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पक्षातून टीका करण्यात आली. विरोध करणाऱ्यांमध्ये सर्वात पुढे गुलाम नबी आजाद आणि कपिल सिब्बल होते. नंतर पक्षाकडून सांगण्यात आले की, राहुल यांनी असे कोणते वक्तव्य केलेच नाही.
पत्रात काय होते?
23 काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी आणि शशी थरूर यांच्यासह 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील मोठ्या बदलांवर भर दिला. ते म्हणाले - नेतृत्व पूर्णवेळ (पूर्ण वेळ) आणि प्रभावी असले पाहिजे, जे या क्षेत्रात सक्रिय असले पाहिजे. त्याचा परिणामही दिसायला हवा. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणुका घेण्यात याव्यात. संस्थेत नेतृत्व करणारी यंत्रणा त्वरित तयार करण्यात यावी. जेणेकरून पक्षाला पुनरुज्जीवन करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. मात्र, त्यांनी असे लिहिले नाही की कॉंग्रेस अध्यक्ष हे बिगर गांधी कुटुंबातील असावेत.
मागच्या वर्षी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष बनल्या होत्या सोनिया गांधी
राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये पक्षाने सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.