आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sukesh Chandrashekhar Kejriwal Ministers Money Laundering Case Update | Satyendra Jain | Kailash Gehlot

केजरीवालांच्या मंत्र्यांवरील ठग सुकेशचे आरोप खरे:चॅट-कॉलमधून सापडले; सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोतांना 120 कोटी रुपये दिल्याचे रेकॉर्ड

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील केजरीवाल सरकारचा त्रास वाढू शकतो. सध्या मंडोली तुरुंगात बंद ठग सुकेश चंद्रशेखरने तिहार तुरुंगात बंद असलेले तुरुंगमंत्री सत्येंद्र जैन, महसूल मंत्री कैलाश गेहलोत आणि तुरुंग डीजी संदीप गोयल यांच्यावर केलेले खंडणीचे आरोप चौकशी समितीच्या अहवालात बरोबर असल्याचे आढळून आले आहे.

लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी सुकेशच्या आरोपांबाबत प्रधान सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन केली होती. या समितीने सुकेशची तुरुंगात दोनदा भेट घेतली आणि या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला आहे.

दिव्य मराठीकडे उपलब्ध असलेल्या या रिपोर्टनुसार, सत्येंद्र जैन आणि कैलाश गेहलोत यांच्याशी सुकेश चंद्रशेखरच्या चॅट आणि फोन कॉल्स आणि व्यवहाराच्या वेळी त्यांचे स्थान या आधारे चौकशी समितीला सुकेशच्या वक्तव्यात तथ्य आढळले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालाच्या आधारे लेफ्टनंट गव्हर्नर लवकरच तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवू शकतात.

वाचा समितीने आपल्या अहवालात काय म्हटले आहे...
उच्चाधिकार चौकशी समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सुकेश चंद्रशेखरने सत्येंद्र जैन यांना 60 कोटी रुपये दिले (आपकडून राज्यसभेची जागा मिळवण्यासाठी 50 कोटी रुपये आणि सुरक्षा रक्कम म्हणून 10 कोटी रुपये), तत्कालीन महासंचालक (तुरुंग) संदीप गोयल यांना 12.50 कोटी रुपये दिले. दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांच्या दिल्लीतील असोला माईन्स येथील फार्म हाऊसवर सत्येंद्र जैन यांना 50 कोटी रोख 4 हप्त्यांमध्ये दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे.

रिपोर्टनुसार, सुकेश चद्रशेखरच्या चॅट्स, कॉल्सवरून हे स्पष्ट होते की मुख्यमंत्री केजरीवाल यांना या आर्थिक व्यवहारांची पूर्ण माहिती होती. पॉवर कमिटीनुसार, सुकेशच्या या दाव्यातही तथ्य आहे की, 2017 मध्ये 50 कोटी रुपयांची डिलिव्हरी पूर्ण झाल्यानंतर सुकेशने हॉटेल हयात रीजेंसी, भिकाजी कामा प्लेस येथे डिनर पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये जैन आणि गेहलोत देखील उपस्थित होते. सुकेश त्याचा फोन, चॅट्स, कॉल्स, लोकेशन आणि काही व्हिडिओ फुटेज तपासासाठी तपास यंत्रणेला देण्यास तयार आहे.

पैसे घेतल्यानंतर जैन केजरीवाल यांच्याशी बोलणे करून द्यायचे : सुकेशचा दावा
हर असोला दिल्ली फार्म हाऊसवर सत्येंद्र जैन आणि कैलाश गेहलोत यांना पैसे दिल्यानंतर सत्येंद्र जैन सीएम अरविंद केजरीवाल यांच्याशी फोनवरून बोलणे करून द्यायचे असा खुलासा सुकेशने तपास समितीसमोर केला आहे.

अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतल्याचे सुकेशने सांगितले. उच्चाधिकार समितीला सुकेशचे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे आढळून आले आहे आणि सत्य बाहेर आणण्यासाठी विशेष एजन्सीची चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

बातम्या आणखी आहेत...