आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Consent Of All Party MPs To Adjourn Parliament Due To Increasing Number Of Patients

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळी अधिवेशन:वाढत्या रुग्णसंख्येमुळे संसदेचे अधिवेशन गुंडाळण्यास सर्वपक्षीय खासदारांची संमती

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत संपू शकते सत्र

३० पेक्षा जास्त खासदारांना कोरोना संसर्ग झाल्याने संसदेचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन लवकरच गुंडाळण्याची चिन्हे दिसत आहेत. संसदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले, हे अधिवेशन पुढील आठवड्यांच्या मध्यावर संपवले जाऊ शकते. यासंबंधी शनिवारी लोकसभेच्या कामकाज समितीची बैठक झाली. या बैठकीस सर्व पक्षांचे नेते, सरकारचे प्रतिनिधी व लोकसभाध्यक्ष यांची उपस्थिती होती. बहुतांश नेत्यांनी संसदेचे १४ सप्टेंबरपासून सुरू झालेले अधिवेशन १ ऑक्टोबरपूर्वी संपवण्यास सहमती दर्शवली.

या सत्रात कपातीचा अंतिम निर्णय संसदीय कामकाजविषयक कॅबिनेट समिती घेईल. सत्रादरम्यान लोकसभेत कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक व एक वर्षांसाठी खासदारांचे वेतन-भत्ते ३० टक्के कपात करण्याच्या विधेयकास मंजुरी देण्यात आली. सूत्रांनी सांगितले, सत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रल्हाद पटेलसह अनेक खासदारांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. संसर्ग झालेल्या खासदारांनी कामकाजात सहभागी होऊ नये, असे त्यांना कळवण्यात आले आहे. यामुळे काही विरोधी पक्षांनी १८ दिवसांचे अधिवेशन जोखमीचे असल्याचे सांगून हे अधिवेशन लवकर संपवावे, असे सरकारला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...