आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारीरिक संबंधांसाठी अल्पवयीनाची सहमती वैध नाही:दिल्ली HC ने रेपिस्टला जामीन दिला नाही: आरोपीने मुलीची जन्मतारीखही बदलली होती

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला. मुलीसोबत सहमतीने संबंध ठेवल्याचा युक्तिवाद करत जामीन देण्याची मागणी आरोपीने केली होती. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती आणि आरोपपत्रात त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता.

न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी जामीन याचिका फेटाळताना म्हटले की, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अल्पवयीनाची सहमती कायद्यानुसार सहमती ठरत नाही. आरोपीने मुलीच्या आधार कार्डातील जन्मतारीख बदलण्याचाही गंभीर गुन्हा केला आहे.

स्वतःला वाचवण्यासाठी आरोपीने मुलीला सज्ञान दाखवले

न्यायमूर्ती जसमीत सिंह यांचे खंडपीठ म्हणाले की, '16 व्या वर्षी संबंध ठेवण्यासाठी अल्पवयीनाची सहमती ही कायद्याच्या नजरेत सहमती ठरत नाही. आरोपी 23 वर्षांचा आहे आणि आधीपासूनच विवाहित आहे. त्यामुळे त्याला जामीनही दिला जाऊ शकत नाही.' कोर्ट म्हणाले की, आधार कार्डवर जन्मतारीख बदलून फायदा उचलण्याचा आरोपीचा प्रयत्न होता असे वाटते. जेणेकरून हे सिद्ध करता येईल की जेव्हा त्याने मुलीसोबत संबंध ठेवले तेव्हा ती अल्पवयीन नव्हती.

मुलीला सोबत घेऊन SDM कार्यालयात गेला

न्यायमूर्ती म्हणाले की, 'घटनेच्या दिवशी मुलीचे वय केवळ 16 वर्ष होते. आरोपीचे वय 23 वर्ष होते आणि तो आधीपासूनच विवाहित होता. आरोपी मुलीला SDM कार्यालयात घेऊन गेला. त्याने आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून जन्माचे वर्ष 2002 वरून 2000 असे केले. जेणेकरून तो हे सिद्ध करू शकेल की त्याने जेव्हा शारीरिक संबंध ठेवले तेव्हा मुलगी अल्पवयीन नव्हती.'

मुलीच्या वडिलांनी FIR दाखल केला

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 2019 मध्ये FIR दाखल करण्यात आला. वडिलांनी म्हटले होते की त्यांची मुलगी गायब आहे. नंतर मुलीचा शोध घेत तिला उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातून परत आणण्यात आले. मुलीने दंडाधिकाऱ्यांसमोर सांगितले की आरोपी तिचा बॉयफ्रेंड होता आणि ती त्याच्यासोबत सुमारे दीड महिना राहिली. तिने सहमतीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते, कारण तिला त्याच्यासोबत राहायचे होते.

बातम्या आणखी आहेत...