आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिसोदियांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही:चर्चा एवढी घसरली आहे तर परिणाम भोगा, माफी मागितली पाहिजे : कोर्ट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अब्रुनुकसान प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सिसोदिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा रद्द करण्याचा अर्ज गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळल्याने आप नेते सुप्रीम कोर्टात पोहोचले.

सोमवारी न्या. संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सांगितले की, सार्वजनिक चर्चा या पातळीपर्यंत घसरली असेल तर परिणाम भोगावे लागतील. देशात काय सुरू आहे, याची पर्वा न करता तुम्ही लोक आरोप लावत आहात. तुम्ही बिनशर्त माफी मागितली पाहिजे होती. आता आरोप कोर्टात सिद्ध करा. सिसोदियांचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, की सिसोदियांनी असे म्हटले नव्हते की, सरमाना पैसे मिळाले आहेत. सिसोदिया यांनी आरोप केला होता की, सरमांनी कोरोनात पीपीई किटचे कंत्राट पत्नीच्या कंपनीला दिले होते.

बातम्या आणखी आहेत...