आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तीन दशकांपूर्वीपर्यंत सहा घोड्यांच्या ज्या शाही बग्गीतून राष्ट्रपती दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामिल व्हायचे ती बग्गी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या नाणेफेकमधून भारताने
जिंकली होती, हे तुम्हाला ठाऊक आहे का?... 26 जानेवारीला राष्ट्रगीतासह राष्ट्रपतींना दिली जाणारी 21 तोफांची सलामी दुसर्या महायुद्धाच्या सात तोफांद्वारे दिली होती, हे तुम्हाला माहित आहे का?...
26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक कसा झाला आणि प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड कशी झाली हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग असेच काही रंजक किस्से जाणून घेऊयात...
- 1984 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रपती भवनात बग्गीच्या वापरावर बंदी आणली गेली.
- 2014 मध्ये तत्कालिन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पुन्हा एकदा बग्गीचा वापर सुरु केला.
- प्रणब मुखर्जी प्रजासत्ताक दिनाच्या बीटिंग रिट्रीटमध्ये सहभागी होण्यासाठी बग्गीने पोहोचले.
- राष्ट्रपतींची बग्गी सागवानच्या लाकडापासून बनलेली असते.
- बग्गीच्या रिम आणि अनेक भागांवर सोन्याची सजावट असते.
- बग्गीचे घोडे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन मिक्स ब्रीडचे असतात.
- 21 तोफांची सलामी देण्यासाठी फक्त सात तोफांचा वापर केला जातो.
- एका रांगेत आठ तोफा ठेवल्या जातात. मात्र सलामी सात तोफांनी दिली जाते.
- या सात तोफा 58 सेकंदांच्या राष्ट्रगीताच्यावेळी तीन-तीन फे-या झाडतात.
- एखाद्या तोफेत बिघाड झाल्यास आठव्या तोफेचा वापर केला जातो.
- 122 जवानांचा हा ताफा मेरठच्या एका आर्टिलरी रेजिमेंटचा एक भाग आहे.
- 105 एमएम या तोफांचा वापर ब्रिटिश सेनेने दुस-या महायुद्धाच्यावेळी केला होता.
- सध्या त्यांची डागडुजी करणे खूप अवघड आहे. ऑर्डिनन्स फॅक्ट्रीत त्यांच्यासाठी केवळ शेल्स बनवतात.
- सलामी देण्यासाठी 105 एमएमच्या नवीन तोफांचे ट्रायल घेतले जात आहे.
26 जानेवारी, 1950 रोजी सकाळी 10:18 वाजता आपण प्रजासत्ताक बनलो, ट्रॅक्टर ट्रॉलीवरुन देखावे सादर झाले
26 जानेवारी 1950 रोजी अडीच वर्षे जुनी आपली लोकशाही एक पाऊल पुढे आली. राज्यघटना अस्तित्त्वात येताच भारत प्रजासत्ताक बनला. तर मग आपल्या लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवाचा पाया कसा घातला गेला ते जाणून घेऊया? 71 वर्षांपूर्वी 26 जानेवारी रोजी काय घडले होते? पहिल्यांदा परेड कशी काढली? आपण लोकशाहीसह प्रजासत्ताक कसे झालो ...
1947 पर्यंत व्हायसरॉय हाऊस आणि त्यानंतर गर्व्हर्मेंट हाऊस म्हणून ओळखल्या गेलेल्या राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये देशाचे राष्ट्रगीत वाजले.
तत्कालीन गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांनी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित केले. त्यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून घोषणा केली. त्यानंतर लगेचच त्यांनी आणि राजेंद्र प्रसाद यांनी खुर्च्या बदलल्या. ते डावीकडे व राजेंद्र प्रसाद उजवीकडे आले.
राजेंद्र प्रसाद यांनी सरन्यायाधीश एच जे कनिया यांच्या उपस्थितीत पदाची शपथ घेतली. दरबार हॉलचे दरवाजे उघडले गेले आणि गव्हर्नर जनरल यांचा ध्वज काढून राष्ट्रपतींचा ध्वज फडकला. 1950 ते 1971 या काळात राष्ट्रपतींचा स्वतःचा वेगळा ध्वज असायचा.
राष्ट्रपतींनी पंतप्रधान, उपपंतप्रधान, सीजेआय, सभापती, सरकारचे मंत्री, फेडरल कोर्टाचे न्यायाधीश आणि महालेखापरीक्षक यांना शपथ दिली.
सहा अश्वांची बग्गी पहिल्या परेडमध्ये सामील होण्यासाठी इर्विन स्टेडिअम म्हणजेच आजचे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमच्या दिशेने रवाना झाली.. घोडेस्वार आणि अंगरक्षकांसह राष्ट्रपतींचा ताफा संसद मार्ग, कॅनॉट सर्कस, बाराखंबा रोड, सिकंदरा रोड आणि हार्डिंग एव्हेन्यूमधून गेला.
राष्ट्रपती स्टेडियमवर दाखल झाले. त्यांनी जीपद्वारे लष्करी पथकाची पाहणी केली. यानंतर ध्वजारोहण केले. राष्ट्रगीतासह राष्ट्रपतींना 31 तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर थोड्याच वेळात, हवाई दलाचे 11 लिबरेटर्स एअरक्राफ्ट जुन्या किल्ल्यावरुन गेले.
तीन हजाराहून अधिक अधिकारी व जवानांनी पहिल्या प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू केली. ही कमांड ब्रिगेडियर जे एस ढिल्लन यांनी सांभाळली. 120 नेव्हीच्या पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर इंदरसिंग यांनी केले. 240 वायुसेनेच्या पथकापैकी एका तुकडीचे नेतृत्त्व स्क्वॉड्रन लीडर व्हीएम राधाकृष्णन यांनी केले. दुसर्या पथकाच्या नेतृत्वाची धुरा स्क्वॉड्रन लीडर जेएफ शुक्ला यांनी केले होते.
पहिला प्रजासत्ताक दिनाची खास झलक छायचित्रांच्या माध्यमातून पाहुयात...
आता त्यांची छायाचित्रे ज्यानी आम्हाला प्रजासत्ताक बनवले...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.