आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Constitution Day 2021| Indian Constitution Day| Marathi News | PM Modi Address Gathering At Parliament

71 वा संविधान दिन:काँग्रेसचा कार्यक्रमावर बहिष्कार; मोदी म्हणाले - एकाच कुटुंबाने पक्ष चालवणं हे लोकशाहीसाठी सर्वात मोठं संकट

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देश आज 71 वा संविधान दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी घराणेशाहीवर निशाणा साधत काँग्रेसला 'पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली' असे संबोधले. मोदी म्हणाले, संविधान निर्मात्यांनी देशाच्या हिताला प्रथम स्थान दिले, मात्र कालांतराने राजकारणाचा नेशन फर्स्टवर इतका परिणाम झाला की, देशाचे हित मागे राहिले.

पंतप्रधानांनी ज्या काँग्रेसवर निशाणा साधला त्या काँग्रेससोबतच देशातील १४ विरोधी पक्षांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, आरजेडी, आययूएमएल आणि डीएमके यांचा समावेश आहे. खरे तर काँग्रेस आणि तृणमूलने या कार्यक्रमात सहभागी होण्यास आधीच नकार दिला होता. यानंतर काँग्रेसच्या आवाहनावर इतर पक्षांनीही कार्यक्रमाला न येण्याचे जाहीर केले.

मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांचे स्मरण
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदी म्हणाले, 'आजचा दिवस बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद यांसारख्या महान व्यक्तींना नमन करण्याचा आहे. या सदनाला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. आज 26/11 सुद्धा आहे. तो दु:खद दिवस, जेव्हा देशाच्या शत्रूंनी आतमध्ये येऊन मुंबईत दहशतवादी घटना घडवून आणली. भारतीय राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे देशातील सामान्य माणसाचे रक्षण करण्याच्या जबाबदारीत आपल्या अनेक शूर जवानांनी त्या दहशतवाद्यांशी लढताना सर्वोच्च बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना मी आज नमन करतो.

राजकारणामुळे राष्ट्रहित मागे राहिले
मोदी म्हणाले, 'कधीआपण विचार करावा की, आपल्याला संविधान बनवायचे असते तर काय झाले असते? स्वातंत्र्याची लढाई, फाळणीची भीती असूनही देशाचे हित सर्वात मोठे, हाच मंत्र संविधान बनवताना प्रत्येकाच्या हृदयात होता. विविधतेने भरलेला देश, अनेक बोली, पंथ, राज्ये, हे सर्व असतानाही संविधानाच्या माध्यमातून देशाला एका बंधनात बांधून देशाला पुढे घेऊन जाणे. आजच्या संदर्भात बघितले तर आपण संविधानाचे कदाचित एक पानही पूर्ण करू शकलो असतो. कारण, काळाने नेशन फर्स्टवर राजकारणाने असा प्रभाव निर्माण केला आहे की, राष्ट्रहित मागे टाकले आहे.

बातम्या आणखी आहेत...