आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) शादरा पीठापर्यंत जाता न येणाऱ्या हिंदूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता उत्तर काश्मीरच्या टीटवाळ भागातील नियंत्रण रेषेलगत शारदा मातेचे मंदिर बांधण्यात येत आहे. हे काम येत्या सप्टेबर महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर खोऱ्यातील भाविकांना तिथे दर्शन घेता येईल.
हिंदू-मुस्लिम-शिखांनी मिळून केली पूजा
मंदिराचे बांधकाम सेवा शारदा समिती काश्मीरच्यावतीने (एसएससीके) केले जात आहे. एसएससीकेचे प्रमुख रविंदर पंडिता यांनी मंदिराच्या बांधकाम स्थळी आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात देशाच्या विविध भागांतून आलेल्या काश्मिरी पंडितांनी सहभाग घेतल्याचे सांगितले. या कार्यक्रमात शिख व मुस्लिम बांधवांनीही सहभाग घेतल्याचे ते म्हणाले.
6 महिन्यांत उभे होईल मंदिर
पंडिता यांनी शारदा मातेच्या मंदिराचे बांधकाम जोरात सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मंदिराचे बांधकाम 6 महिन्यांच्या आत पूर्ण होईल. त्यानंतर ते भाविकांसाठी खूले होईल. पाकव्याप्त काश्मिरातील शारदा पीठ मंदिराची जुनी तीर्थयात्रा नव्याने सुरू करण्यासाठी या मंदिराचे बांधकाम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकातून मागवले ग्रॅनाइट
मंदिराच्या बांधकामाचा नकाशा व मॉडल कर्नाटक स्थित श्रृंगेरी दक्षिण मठाने मंजूर केला आहे. या मंदिरासाठी वापरण्यात येणारा ग्रॅनाइट दगड कर्नाटकच्या बिदादी येथून मागवण्यात येणार आहे.
1947 साली उद्ध्वस्त झाले होते मंदिर
शारदा पीठाचा अर्थ शारदेची जागा किंवा गादी असा होतो. हे देवी सरस्वतीचे काश्मिरी नाव आहे. शारदा पीठ पीओकेतील नीलम नदीच्या किनाऱ्यावर शारदा नामक गावात स्थित आहे. हे पीठ 18 महाशक्ती पीठांपैकी एक आहे. हिंदू मान्यतेनुसार, येथे देवी सतीचा उजवा हात पडला होता. हा ऐतिहासिक वारसा 1947 साली उद्ध्वस्त करण्यात आला होता.
महाराजा गुलाबसिंह यांनी केली होती मंदिराची दुरुस्ती
शारदा पीठात देवी सरस्वतीची आराधना केली जाते. हे पीठ भारतीय उपखंडातील प्रमुख प्राचिन विद्यापीठांपैकी एक होते. शंकराचार्य येथेच सर्वज्ञपीठावर बसले होते. महाराजा गुलाब सिंह यांनी 19 व्या शतकात या मंदिराचा अखेरचा जिर्णोद्धार केला होता. या मंदिरात स्वातंत्र्यानंतर एकदाही पारंपरिक पूजा झाली नाही.
दर्शनासाठी घ्यावे लागते नाहरकत प्रमाणपत्र
शारदा पीठ नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे दर्शनासाठी सहजपणे परवानगी मिळत नाही. मंदिरापर्यंत जाण्यासाठी भारतीयांना नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यामुळे स्थानिकांनी या ठिकाणी करतारपूरच्या धर्तीवर येथेही कॉरिडॉर (मार्गिका) तयार करण्याची मागणी केली आहे. एलओसीपासून हे पीठ 10 किमी अंतरावर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.