आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफ जवानाला स्टेट ऑपरेशन सेलने शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली. त्याला आता ३० नोव्हेंबरला न्यायालयात पुन्हा हजर केले जाईल.
महाराष्ट्रातील अहमदनगरमधील सासेवाडी गावाचा प्रकाश काळे हा ऑगस्ट २०१९ मध्ये येथे तैनात झाला होता. तो पाकमधील महिलेच्या संपर्कात होता. ती महिला पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटरची हेर होती. ती संस्था इतर गुप्तचर संस्थांना माहिती पुरवते. सध्या बीएसएफ जवानाची चौकशी सुरू असून त्याच्याकडून अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
गस्तीबाबतची माहिती ग्रुपवर टाकली जायची
बीएसएफ जवान प्रकाश काळे फेसबुकच्या माध्यमातून महिलेच्या संपर्कात आला होता. ऑगस्ट २०२०पासूच महिलेला त्याने बीएसएफच्या हालचालींची माहिती देणे सुरू केले. त्याने बीएसएफ जवानांचा एक ग्रुपही बनवला होता. तो स्वत: त्याचा अॅडमिन होता. जवानांची ड्यूटी किंवा गस्तीबाबत जी माहिती ग्रुपवर टाकली जायची ती महिलेपर्यंत आपोआप जायची. महिला भारतीय सिमचा वापर करत होती आणि ती त्याच ग्रुपमध्ये सामीलही होती. या संस्थेचा मुख्य हेतू बीएसएफच्या प्रत्येक हालचालीची माहिती घेणे हा होता.
जवानाविरोधात घरिंडा पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा
पाकच्या संस्थेला माहिती पाठवणाऱ्या बीएसएफ जवानाला शुक्रवारीच पकडण्यात आले होते. त्याविरोधात घरिंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नंतर स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली जात असून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.