आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Contrary To The Trend, The Gold stock Market Moves, The Prospect Of Further Uptrend, The Two Largest Investment Projects In The Market

नवी जुगलबंदी:ट्रेंडच्या विपरीत सोने-शेअर बाजाराची चाल, पुढेही तेजीची शक्यता, बाजारात बऱ्याचदा उलटी चाल चालणारे दोन सर्वात मोठे गुंतवणूक प्रकल्प कोरोना काळात नव्या मार्गावर

जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रेंडच्या विपरीत सोने-शेअर बाजाराची चाल, पुढेही तेजीची शक्यता
  • मार्चपासून आतापर्यंत ५० टक्क्यांपर्यंत वाढला निफ्टी, सोने ५५ हजारापर्यंत

सोने आणि शेअर बाजाराची चाल उलट असणे हा बाजाराचा कल आहे. म्हणजे, साेने वधारल्यास शेअर बाजार पडतो. बऱ्याचदा शेअर बाजार निराशावादी असतो तर सोने चांगली कामगिरी करते. कोरोना काळाच्या आधीपर्यंत जगभरासाठी हा फंडा मान्य होता. मात्र, आता तसे नाही. यातून हे कळते की, मार्च, २०२० मध्ये ७,६१० अंक नीचांकी पातळीपासून निफ्टी ११,२०० अंकापर्यंत पोहोचला. वाढ ५०% राहिली. सोने अद्यापही ४० हजार ते ५५ हजारचा प्रवास निश्चित केला. म्हणजे सोने व शेअर दौन्हींत मैत्री झाली आहे.

डॉलर इफेक्ट : जगभरातील देशांची सोन्यात गुंतवणूक

अातापर्यंत सर्व देश आपल्या विदेशी चलन गंगाजळीत डॉलरला प्राधान्य देत होते. बहुतांश देशांकडून मदत पॅकेज दिल्याने डॉलर कमकुवत झाला. या पार्श्वभूमीवर सर्व देश आता विदेशी चलन भांडारात सोन्याची हिस्सेदारी वाढवत आहेत. सध्या भारताच्या विदेशी चलन भांडारात सोन्याची हिस्सेदारी ७ टक्क्यांपेक्षा कमी आहे, जी अमेरिका आणि युरोपीय देशांपेक्षा खूप कमी आहे. भारतही साेने वाढवेल.

शेअर बाजारास चांगल्या कामगिरीची आशा
कोरोनामुळे बहुतांश देश अर्थव्यवस्थेतून सावरण्यासाठी मदत पॅकेज देत आहेत. त्यामुळे चलन छापत आहेत. दुसरीकडे, अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर जवळपास शून्य केले आहे. या कारणामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात भांडवल येत आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांत तेजी आहे. भारताचे शेअर बाजारही याला अपवाद नाहीत.

भारतात सोन्याची मागणी घटली
वित्तीय विश्लेषक धर्मेंद्र जैन म्हणाले, भारतात सोन्याची मागणी परतत आहे. २०१९ मध्ये भारतात सोन्याची मागणी ९% पर्यंत घटली होती. दुसरीकडे, जानेवारीपासून मार्च २०२० पर्यंत भारतात सोन्याची मागणी १०१.९ टन होती. जी गेल्या वर्षी समान अवधीच्या १५९ टनांच्या तुलनेत ३३% कमी आहे. मागणी घटताना किंमत का वाढतेय, हा प्रश्न आहे.

जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनाचे मूल्य घटते. सोने आदर्श बचावाच्या रूपात काम करते. भारतीय सोने खरेदी करा किंवा नाही, किमतीत घट येण्याची शक्यता नाही. असेच इक्विटीसोबतही असते. जगभरातील केंद्रीय बँकांनी २०१९ मध्ये ६५० टन सोन्याचे भांडार जोडले. ही ५० वर्षांत दुसरी मोठी वृद्धी आहे. डिसेंबर २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत चीनने १०० टनांपेक्षा अधिक जोडले आणि खरेदी सुरू आहे. जगभरात सोन्याचे एकूण मूल्य १०.५ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. जगाचे एकूण कर्ज २९०-३०० खर्व डॉलर आहे. हे सोन्याच्या मूल्याच्या ३० पट जास्त आहे. सोने आणि कर्जाचे योग्य प्रमाण २० पट असायला हवे. त्यामुळे एक तर कर्ज कमी करावे लागेल, ही शक्यता कमी आहे किंवा पुन्हा सोन्याचा साठा वाढवावा लागेल. त्यामुळे सर्व देश योग्य प्रमाणात कायम ठेवण्याच्या प्रयत्न करतील.

बातम्या आणखी आहेत...