आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Controversial Post Leads To Violence In Bangalore, 3 Killed In Firing; 110 Rioters Arrested Including Congress MLA's Nephew

कर्नाटक:वादग्रस्त पोस्टमुळे बंगळुरूत हिंसाचार, गोळीबारात 3 ठार; काँग्रेस आमदाराचा पुतण्या, 110 दंगेखोर अटकेत

बंगळुरूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दंगलग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई, कर्नाटकचे गृहमंत्री बी. एस. बोम्मई यांची घोषणा

कर्नाटकातील काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या पुतण्याने फेसबुकवर टाकलेल्या कथित वादग्रस्त पोस्टमुळे मंगळवारी रात्री उशिरा बंगळुरूत प्रचंड तणाव पसरला. हजारो लोक रस्त्यावर उतरले. २५० हून अधिक वाहनांची जाळपोळ झाली. संतप्त जमावाने आमदारासह त्यांच्या बहिणीच्या घरी तोडफोड केली. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अगोदर लाठीमार केला. अश्रुधुराची नळकांडी फोडली. मात्र, जमाव आटोक्यात येत नसल्याचे पाहून गोळीबार केला. यात तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हिंसाचारात ५० पोलिसांसह शेकडो लोक जखमी झाले आहेत. ११० जणांना अटक करण्यात आली.

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या नवीन मूर्ती यालाही अटक करण्यात आली. दंगलग्रस्त डीजे आणि केजीहळ्ळी भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मंदिराच्या सुरक्षेसाठी मुस्लिम युवकांनी मानवी साखळी केली

बंगळुरूत हिंसाचारादरम्यान मुस्लिम युवकांनी डीजी हळ्ळी ठाण्याच्या हद्दीत एका मंदिराच्या सुरक्षेसाठी मानवी साखळी केली आणि दंगेखोरांपासून मंदिर वाचवले. व्हिडिओत हिंसक जमाव मंदिराच्या दिशेने येताना दिसते आहे. मात्र, मुस्लिम युवकांनीच या जमावाला रोखल्याचे दिसत आहे.

दंगलग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई

कर्नाटकचे गृहमंत्री बी. एस. बोम्मई यांनी दंगेखोरांची मालमत्ता विकून नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली. उत्तर प्रदेशमध्येही योगी सरकारने अशीच घोषणा केली होती.

बातम्या आणखी आहेत...