आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Controversial Program Of Sudarshan TV : Petitioner People Are Incited Against Muslims Through The Program; Justice Chandrachud: If You Don't Like A Show, Read A Novel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुदर्शन टीव्हीचा वादग्रस्त कार्यक्रम:याचिकाकर्ता - कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना मुस्लिमांविरुद्ध भडकावले जातेय; न्या. चंद्रचूड : तुम्हाला एखादा कार्यक्रम आवडत नसेल तर कादंबरी वाचा

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाची सुदर्शन टीव्हीच्या शपथपत्रावर तीव्र नाराजी
  • डिजिटल मीडिया : दिशानिर्देश जारी करण्याची गरज - केंद्र

सुदर्शन टीव्हीच्या यूपीएससी जिहाद या वादग्रस्त कार्यक्रमाविरुद्ध दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सुदर्शन टीव्हीच्या शपथपत्रावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, तुम्ही कार्यक्रमात काय बदल कराल, हे विचारले होते. कोणत्या चॅनलने काय दाखवले, हे नाही. सुदर्शन टीव्हीचे वकील विष्णु शंकर जैन यांनी प्रसारणासाठी प्रोग्रॅमिंग संहितेचे पालन करू असे म्हणत परवानगीची मागणी केली. कोर्टाने चॅनलची सर्व एपिसोड पाहण्याची विनंतीही धुडकावली. न्या. चंद्रचूड म्हणाले, ७०० पानांच्या पुस्तकाविरुद्ध याचिका असेल तर जजने पूर्ण पुस्तक वाचावे, असा युक्तिवाद वकील करू शकत नाही. पुढील सुनावणी बुधवारी होईल.

जामियाच्या तीन विद्यार्थ्यांचे वकील शादान फरासत म्हणाले, लोकांना मुस्लिमांविरुद्ध भडकावले जात आहे. त्यांना अस्तनीतले निखारे असेही संबोधले जात आहे. त्यावर न्या. चंद्रचूड म्हणाले, तुम्हाला एखादा कार्यक्रम आवडत नसेल तर तो पाहू नका. एखादी कादंबरी वाचा.

डिजिटल मीडिया : दिशानिर्देश जारी करण्याची गरज - केंद्र

सुदर्शन टीव्ही प्रकरणात सुप्रीम कोर्टातील शपथपत्रात केंद्राने म्हटले आहे की, वेब आधारित डिजिटल मीडियावर नियंत्रणाची गरज आहे. त्यात वेब नियतकालिके, वेब चॅनल्स-वृत्तपत्रे समाविष्ट आहेत. डिजिटल मीडिया स्पेक्ट्रम व इंटरनेटचा वापर करतो. ती सार्वजनिक संपत्ती आहे. सध्या हा मीडिया विस्तारला आहे. येथे फालतू व्हिडिओ, भ्रामक बातम्या दाखवल्या जातात. ज्याचा लोकांवर परिणाम होतो. यामुळे दिशानिर्देश व नियम आखून देण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...