आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Controversial Statement About The Word Hindu, Congress Leader Stand On Statement

'हिंदू शब्दाचा अर्थ गलिच्छ'च्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेता ठाम:म्हणाले - मला चुकीचे सिद्ध केले तर मी आमदारकी सोडेल

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू हा शब्द पर्शियातून आला असून हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ असल्याचे म्हटले होते. यावरुन राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, सतीश जारकीहोळी हे आपल्या वक्तव्यावर ठाम असून त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. जर कोणी मला चुकीचे सिद्ध केले तर राजीनामा देण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हिंदू हा शब्द पर्शियामधून आला असून याचा अर्थ अत्यंत लाजिरवाणा आहे, असे विधान सतीश जारकीहोळी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून बराच वाद झाला होता, मात्र ते अजूनही आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत.

सतीश जारकीहोळी यांनी व्हिडिओ जारी करत आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, मी जे बोललो त्यात काहीही चुकीचे नाही. अशा हजारो नोंदी आहेत, ज्यात हिंदू हा शब्द पर्शियनमधून आल्याचे लिहिलेले आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सत्यार्थ प्रकाश, डॉ.जी.एस.पाटील यांच्या बसव भारत या पुस्तकात आणि बाळ गंगाधर टिळकांच्या केसरी वृत्तपत्रातही याचा उल्लेख आहे. ही तर काही उदाहरणे आहेत. विकिपीडिया किंवा इतर संकेतस्थळांवर असे अनेक लेख आहेत. ते तुम्ही वाचावे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जर कोणी मला चुकीचे सिद्ध केले तर मी केवळ वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही तर आपल्या आमदारकीचा राजीनामाही देईल.

कर्नाटकातील बेलगावी जिल्ह्यातील निप्पाणी भागात आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते जारकीहोळी सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले होते की, हिंदू शब्दाचा उगम कुठून झाला? हा शब्द आपला आहे का? हा इराण, इराक, उझबेकिस्तान, कझाकिस्तानातील पर्शियन शब्द आहे. या शब्दाचा भारताशी काय संबंध? या शब्दाचा स्वीकार तुम्ही कसा करू शकता? यावर चर्चा व्हायला पाहिजे. हिंदू’ शब्दाचा भारताशी काहीही संबंध नाही, हा शब्द लोक कसा काय स्वीकारु शकतात, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच या शब्दाचा अर्थ जर कळला तर तुम्हाला लाज वाटेल, असेही जारकीहोळी म्हणाले आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जारकीहोळी हे कर्नाटक सरकारमध्ये माजी मंत्री राहिले आहेत.

व्होट बँकेसाठीचा प्रयत्न
जारकीहोळी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने आता काँग्रेसवर निशाणा साधत याला व्होट बँकेसाठीचा प्रयत्न असल्याचे म्हटले. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, शिवराज पाटील यांच्यानंतर आता कर्नाटक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंना चिथावणी दिली आहे आणि त्यांचा अपमान केला आहे. हा योगायोग नाही. हे व्होटबँकसाठी आहे.

विश्व हिंदू परिषदेची प्रतिक्रिया

यावर प्रतिक्रिया देताना विहिंपचे नेते विनोद बन्सल म्हणाले की, "काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. ज्याला कोणताच नावीक नाही.

काँग्रेसनेही नोंदवला निषेध

जारकीहोळी यांचे वक्तव्य अत्यंत दुर्देवी असल्याचे सांगत काँग्रेसकडूनही निषेध नोंदवण्यात आला आहे. हिंदू धर्म ही एक जीवनशैली असून सभ्यतेचे वास्तव आहे. काँग्रेसने धर्म, संस्कृती आणि श्रद्धा जपण्यासाठी देशाची निर्मिती केली आहे. हेच भारताचे सार आहे, असे ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे.

गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला

काँग्रेस नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी जिहाद केवळ इस्लाममध्येच नाही, तर भगवद् गीता व ख्रिश्चन धर्मातही असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. गीतेच्या एका भागात श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याचे ते म्हणाले होते. पाटील यांच्या या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेत भाजप प्रवक्त्याने काँग्रेसवर मतपेटीचे राजकारण करण्याचा आरोप केला होता. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...