आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअग्निपथ योजना व राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरुन संतप्त झालेले काँग्रेस नेते सुबोध कांत सहाय यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली. पण या प्रकरणी वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपण केवळ जुने नारे देत होतो असे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसचे झारखंडचे नेते सुबोध कांत सहाय यांनी सोमवारी पक्षाच्या जंतरमंतरवरील सत्याग्रह आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले - "पीएम मोदी हिटलरच्या मार्गाने वाटचाल करत आहेत. ते हिटलरसारखेच मरतील." ते हे बोलत असताना व्यासपीठावर काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते. त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्या पिटल्याचेही ऐकण्यात आले.
सहाय म्हणाले -"माझ्या मते हिटलरचा संपूर्ण इतिहास याने पाठ केला आहे. हिटलरनेही अशीच एक संस्था तयार केली होती. खाकी असे तिचे नाव होते. मोदी हिटलरच्या मार्गाने चालत असतील तर ते त्याच प्रकारे मरतील. हे त्यांनी विसरू नये."
मोदींना मदारीही म्हणाले
सहाय म्हणाले -"झारखंडमध्ये आमचे आघाडी सरकार आहे. ते पाडण्यासाठी मागील दीड महिन्यांपासून दररोजी ईडीच्या धाडी पडत आहेत. मुख्यमंत्र्यांना गोवण्यासाठी कट कारस्थान रचले जात आहे. भाजपने आपले 2-3 सरकार कसे पाडले याचा आपल्याला विसर पडता कामा नये. मोदींनी एखाद्या मदाऱ्यासारखी देशात हुकूमशाही लादली आहे."
काँग्रेस हा शहिदांचा पक्ष असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, "काँग्रेसने केव्हाच लक्ष्मण रेषा ओलांडली नाही. सोनियांनी पंतप्रधानपद स्विकारण्यास नकार दिला तेव्हा मी त्यांचे माइक खेचून घेतले. मी तुम्हाला बोलू देणार नाही, असे मी तेव्हा म्हणालो होतो. कारण, आम्ही त्यांच्या नावाने निवडून आलो होतो. तुम्ही त्यांच्यावर शिंतोडे उडवतात. काँग्रेसचा कोणताच कार्यकर्ता हे सहन करणार नाही."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.