आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रतन टाटांशी पंगा घेणारे सायरस मिस्त्री:टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन का झाली होती हकालपट्टी? कळीचे तीन मुद्दे वाचा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध उद्योजक तथा टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. त्यांची कार दुभाजकाला धडकल्याने ते जागीच गतप्राण झाले. उद्योग क्षेत्रात एक मोठा व्यक्ती गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या हाती आल्यानंतर त्यांच्या निर्णयामुळे टाटा समूहाचे पालक रतन टाटा आणि मिस्त्री यांचे अनेकदा खटके उडाले. तो वाद बराच काळ चर्चेत राहीला आहे. त्याबद्दल आज जाणून घे्णार आहोत.

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांचा वाद कशावरून पेटला ? टाटा समूहाच्या बोर्डाने ठराव मंजूर करून अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना काढून टाकले होते. अर्थात यामागे अनेक कारणे होती. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींना हटविण्याची वेळ का आली. याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांचा वाद मोठा टोकाला गेला होता. त्यामुळे टाटा समूहाच्या कार्यकारिणी मंडळाने 24 ऑक्टोबर 2016 रोजी सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केली. अवघ्या 4 वर्षांतच 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यामागचे कारण जाणून घेणार आहोत.

ओडिशा विधानसभा निवडणूक ठरली कळीचा मुद्दा
कोणत्याही मोठ्या उद्योगात कळीचा मुद्दा समजला जातो तो निवडणूकीचा. याच कारणावरून रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांचे खटके उडायला सुरूवात झाली. सायरस मिस्त्री यांच्या सल्लागारापैकी एकाने ओडीसाच्या 2014 साली विधानसभा निवडणुकांच्या काळात 10 कोटी रुपयांचा निधी गुंतवावा असा सल्ला दिला होता. यामागे प्रमुख कारण होते की, ओडिशामध्ये टाटा मालकीची सगळ्यात मोठी लोखंडाची खाण आहे. निवडणूक काळात मदत झाली तर भविष्यात कंपनीला मदत होईल, असे मत सायरस मिस्त्री यांचे होते. परंतू या विचाराला टाटा सन्सच्या बोर्डने तीव्र विरोध केला.

टाटा फक्त संसदीय निव़डणुकांमध्ये मदत करेल, असा त्यांचा अलिखीत निर्णय आहे. त्यात बदल झाला नाही. सायरस मिस्त्री यांचा हा विचार तिथेच हाणून पाडला गेला. विशेष म्हणजे मिस्त्री यांच्या मनात हा विचार आलाच कसा असा प्रश्न रतन टाटा यांना पडला होता. तेव्हापासून रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली.

सैन्यदलातील कंत्राटावरून फिसकटले

आर्मीमधील एका मोठ्या कंत्राटासाठी टाटा समूहाच्या दोन वेगवेगळ्या शाखांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यासोबत एकत्र काम करण्याची बोली लावली. तेव्हा रतन टाटा यांना मोठी चिंता लागली होती. या कंत्राटासाठी साठ हजार कोटींची बोली लावली गेली होती. त्यात 2600 आर्मीच्या लढाऊ वाहनांसाठी टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक एक्युपिमिंट डिव्हीजन ने Bharat Forge सोबत एकत्र कामासाठी. तर TATA Motars ने Titagarh wagons सोबत दुसरी बोली लावली होती. दोन्ही बोली वेगवेगळ्या लावल्यामुळे टाटा समूहाच्या एकीला तडा गेला होता. त्यामुळे उद्योग क्षेत्रात टाटा समूहावर हास्यास्पद चर्चा सुरू झाली. ही बाब प्रामुख्याने रतन टाटा यांना खटकली होती. हे कंत्राट कुणाला मिळाले. यापेक्षा कंपनीची एकी महत्त्वाची होती.

TATA आणि Welspun करारातही झाली नव्हती विचारणा
टाटा कंपनीचा मोठा विस्तार आहे. त्यामुळे सर्व कराराबाबत टाटा सन्सच्या कार्यकारी मंडळाला कळविले जात नाहीत. मात्र, जे मोठे करार आहेत किंवा कंत्राटाची माहिती बोर्डाला दिली जाते. त्यासाठी टाटा बोर्डला माहिती देणे परवानगी घेणे गरजेचे असते. टाटा आणि वेल्सपन यांच्या कराराबाबत असेच झाले. रतन टाटा यांचे म्हणणे होते की, ह्या करारात मिस्त्रींनी टाटा सन्स चे अधिकार डावलून कंपनीच्या कायद्यांच उल्लंघण केलंय. मिस्त्रींचा आक्षेप ब्रेच हा शब्दाला होता. मग चर्चेनंतर हा शब्द बदलण्यात आला. त्याऐवजी असोसिएशनची अनुसरुन नाही, असे वापरले गेले. यावरून रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात मोठा वाद झालेला होता.

बातम्या आणखी आहेत...