आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हॅक्सीन पोर्क जिलेटिनचा वाद वाढत आहे. देशातील नऊ मुस्लिम संघटनांनी म्हटले आहे की, ते चीनमध्ये बनलेल्या लस घेणार नाहीत. त्यांनी यावर एक फतवा जारी केला आहे. खरेतर, चर्चा आहे की काही व्हॅक्सीनमध्ये पोर्क जिलेटिन, म्हणजेच डुकराची चरबी वापरली आहे. इस्लाममध्ये पार्कने बनलेले कोणतेही उत्पादन हराम मानले जाते.
नुकतेच UAE चे शीर्ष इस्लामी संघटन फतवा काउंसिलने कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनमध्ये पोर्क जिलेटिन असूनही हे समजण्यासारखे असल्याचे म्हटले होते.
कंपनींनी पोर्क फ्री व्हॅक्सीनचा दावा केला
अनेक कंपन्यांनी पोर्क-फ्री म्हणजेच डुकराच्या जिलेटिनचा वापर न करता व्हॅक्सीन विकसित करण्याचा दावा केला आहे. फायजर, मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेकाने कायदेशीर नोटीस जारी करुन म्हटले आहे की, त्यांच्या व्हॅक्सीनमध्ये पोर्क जिलेटिनचा वापर केलेला नाही. या कंपन्यांनी म्हटले आहे की, व्हॅक्सीनचा वापर प्रत्येकजण करु शकतो.
व्हॅक्सीनवर ही चर्चा का होत आहे?
खरेतर, अशा प्रकारची चर्चा अक्टोबरमध्ये सुरू झाली होती. जेव्हा इंडोनिशनय राजकारणी आणि इस्लामिक धर्मगुरू कोरोना व्हॅक्सीनवर चर्चा करण्यासाठी चीनमध्ये पोहोचले होते. हा ग्रुप इंडोनेशियाच्या जनतेसाठी व्हॅक्सीनची डील फायनल करण्याच्या उद्देशाने पोहोचला होता. येथे व्हॅक्सीन तयार करण्याच्या पध्दतीची माहिती मिळाल्यानंतर धर्मगुरुंनी यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.