आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुल गांधी यांच्या लंडनमधील विधानाने मंगळवारी वादंग निर्माण झाले. इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘भारतात लोकशाही संपुष्टात येत आहे. युरोप आणि अमेरिका लोकशाहीची शेखी मिरवतात. मात्र भारतात लोकशाही संपुष्टात येत असताना ते शांतपणे बसून आहेत.’
राहुल गांधी म्हणाले, ‘युरोपहून ३ ते ४ पट मोठ्या देशात लोकशाही संपुष्टात येत असेल तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? खरे तर भारतात असे घडत आहे पण कोणीच प्रतिक्रिया देत नाही. त्याचे कारण म्हणजे व्यवसाय आणि पैसा. अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा ३ ते ४ पट मोठ्या देशात लोकशाही समाप्त होत आहे आणि तिच्या सुरक्षेची द्वाही पिटणारे अमेरिका आणि युरोप हे गुपचूप पाहात आहेत.’
राहुल यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे. भाजपने त्यांच्यावर कठोर टीका केली. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांच्यासह सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही माफी मागावी, अशी मागणी केली. ते म्हणाले, खरगे आणि सोनिया राहुल यांच्या विधानाशी असहमत असतील तर त्यांनी पुढे यावे. अन्यथा तेही राहुल यांच्या मताशी सहमत आहेत, असे आम्ही मानू. विदेशात राहुल यांनी केलेल्या विधानामुळे भाजपच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.