आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द केरला स्टोरी' चित्रपटाचा वाद वाढत चालला आहे. चित्रपटाचा अदा शर्माचा टिझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माकपचे राज्यसभेचे खासदार जॉन ब्रिटास यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सोशल मीडियावरवर व्हायरलहोत असलेला चित्रपट 'द केरला स्टोरी'च्या टिझरविरुद्ध कारवाई करण्याचा आग्रह केला आहे. पत्रात लिहिले आहे की, ते खोटी माहिती पसरवत आहेत, जी सार्वजनिक शांतता भंग करू शकते आणि यातून केरळची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
टिझरविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश
'द केरला स्टोरी'चा टीझर समोर येताच निर्मात्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. आता 'द केरळ स्टोरी'च्या टीझरवर एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता केरळच्या डीजीपींनी तिरुवनंतपुरमच्या पोलीस आयुक्तांना 'द केरला स्टोरी'च्या टिझरवर एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
केरळ पोलिसांनी सांगितले- केरळच्या डीजीपींनी तिरुअनंतपुरम शहराच्या पोलिस आयुक्तांना 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या टिझरवर एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हायटेक क्राइम इन्क्वायरी सेलने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आणि त्याचा अहवाल डीजीपींकडे पाठवला.
माकप खासदाराने गृहमंत्री अमित शहांना लिहिले दोन पानी पत्र
अहवालाच्या आधारे डीजीपींचे निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार, 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर तामिळनाडूतील एका पत्रकाराने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहिले. पत्रकाराने केरळ सरकारला चित्रपटाच्या दिग्दर्शकाला बोलावून टिझरच्या सत्यतेची चौकशी करण्याची विनंती केली होती, ज्यात दावा केला होता की, केरळमधील 32,000 मुलींचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आले, ज्या नंतर दहशतवादी गट ISIS मध्ये सामील झाल्या.
काय दाखवले टिझरमध्ये?
टिझरमध्ये केरळमधील 32,000 महिलांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. ज्यांना ISIS (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) या दहशतवादी गटांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवण्यात आले आहे. यावरून वादाला तोंड फुटले आहे.
टिझरमध्ये अदा शर्मा बुरख्यात दिसते. संवादात ती म्हणते की, तिला हिंदू धर्मातून इस्लाममध्ये आणण्यात आले, शालिनी उन्नीकृष्णनची फातिमा बनवण्यात आले. तिला नर्स बनून जनतेची सेवा करायची होती, पण ती दहशतवादी बनली. ही कथा केरळ राज्यातून गायब झालेल्या अदासारख्या 32 हजार मुलींची आहे. सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा टिझर समोर येताच वादाला तोंड फुटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.