आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Conversion For Marriage Is Punishable By Up To 10 Years; The Offense Is Non bailable, With A Maximum Fine Of Rs 50,000 : UP Government Ordinance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपी सरकारचा अध्यादेश:लग्नासाठी धर्मांतर केल्यास 10 वर्षांपर्यंतची शिक्षा; हा गुन्हा अजामीनपात्र, दंडाची कमाल मर्यादा 50 हजार रुपये निश्चित

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधेयकातील तरतुदींनुसार, धर्मांतरासाठी दोन महिने आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सूचना देणे अनिवार्य

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मंगळवारी एका वादग्रस्त अध्यादेशाला मंजुरी दिली. त्यानुसार फक्त लग्नासाठी केलेल्या धर्मांतरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या गुन्ह्यासाठी कमाल १० वर्षांची कैद आणि ५०,००० रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या अध्यादेशाला मंजुरी देऊन लगेचच तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. विधेयकातील तरतुदींनुसार, धर्मांतरासाठी दोन महिने आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सूचना देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सूचनेसह संबंधित व्यक्तीला धर्मांतरासाठी योग्य कारण देऊन ते सिद्ध करावे लागेल. राज्याचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी सांगितले की, ‘खोटे बोलून, प्रलोभन किंवा कपटाच्या माध्यमातून धर्मांतर करणे, करवून घेणे हा अजामीनपात्र गुन्हा असेल. त्यासाठी किमान सहा महिने आणि कमाल १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.’

अध्यादेश अलाहाबाद हायकोर्टाच्या ज्या निकालाच्या आधारावर तयार झाला, त्याला कोर्टानेच दिली स्थगिती

उत्तर प्रदेश सरकारने हा अध्यादेश अलाहाबाद हायकोर्टाच्या एका निकालाचा आधार घेऊन आणला आहे. त्यात हायकोर्टाने म्हटले होते की,‘श्रद्धेत बदल झाल्याशिवाय फक्त लग्नासाठी धर्म बदलून इस्लाम स्वीकारणे वैध नाही.’ यात विशेष बाब ही आहे की, हायकोर्टाने गेल्या सोमवारीच आपल्या या निकालाला स्थगिती दिली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser