आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Conversion Made Solely For Marriage Unacceptable: Court Rejects Married Couple's Petition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलाहाबाद:फक्त लग्नासाठी केलेले धर्मांतर अस्वीकारार्ह : कोर्ट, विवाहित जोडप्याची याचिका फेटाळून लावली

अलाहाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद उच्च न्यायालयाने पोलिस सुरक्षा देण्याच्या मागणीबाबत एका विवाहित जोडप्याने दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली. मुलगी जन्माने मुस्लिम होती, पण लग्नाच्या आधी एक महिना तिने आपला धर्म बदलला होता हे माहीत झाल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. धर्मांतर फक्त लग्नाच्या उद्देशानेच केले होते हे यावरून स्पष्ट होते, अशी टिप्पणी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी केली. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी नूरजहाँ बेगम ऊर्फ अंजली मिश्रा विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार आणि इतर या प्रकरणांत २०१४ मध्ये देण्यात आलेल्या एका निकालाचा हवाला दिला. फक्त लग्नाच्या उद्देशाने केलेले धर्मांतर अस्वीकारार्ह आहे, असे या निकालात म्हटले होते. आम्ही घटनेच्या कलम २२६ अंतर्गत दाखल केलेल्या या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे म्हणत न्यायालयाने ही रिट याचिका फेटाळून लावली.

नूरजहाँ बेगम प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने विवाहित जोडप्याला संरक्षण देण्याची विनंती करणाऱ्या रिट याचिका फेटाळून लावल्या होत्या. मुलीने हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्म स्वीकारला होता आणि त्यानंतर निकाह केला होता, असे याचिकांत म्हटले होते. इस्लामबद्दल माहिती नसताना किंवा त्यात श्रद्धा निर्माण होण्याआधीच फक्त निकाहसाठी मुस्लिम मुलाच्या आग्रहावरून हिंदू मुलीचे धर्मांतर वैध आहे का, या मुद्द्यावर त्या प्रकरणात विचार करण्यात आला होता.