आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Convict Even If There Is No Direct Evidence Of Solicitation Of Bribe: Supreme Court

भ्रष्टाचाराचा कॅन्सर व्यवस्थेला पोखरतोय:लाच मागितल्याचा थेट पुरावा नसेल तरीही दोषी : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय अधिकारी- कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याविरोधात लाच मागितल्याचा थेट पुरावा नसला किंवा तक्रारकर्त्याचा मृत्यू झाला असला तरीही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्याला भ्रष्टाचाराचा दोषी ठरवता येते,असे न्या. अब्दुल नजीर, न्या. बी. आर. गवई, न्या. ए. एस. बोपन्ना, न्या. व्ही. राम सुब्रमण्यम आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या पीठाने स्पष्ट केले. लाचखोरीची तक्रार करणाऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा थेट पुरावा नसेल तर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला दोषी ठरवता येते का, असा सवाल नीरज दत्ता विरुद्ध सरकार प्रकरणात उपस्थित करण्यात आला होता. भ्रष्टाचार कॅन्सर असून तो सरकारी व्यवस्थेच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करत आहे,अशा शब्दांमध्ये न्यायालयाने त्यावर परखड मत व्यक्त केले.

तक्रारकर्त्याच्या मृत्यूनंतरही दिलासा मिळू शकत नाही कर्मचारी स्वत: लाच मागत असेल तर तक्रारकर्त्याचा मृत्यू झाला अन् थेट पुरावा नसला तरी त्या कर्मचाऱ्याला दिलासा मिळू शकत नाही. न्या. नागरत्ना म्हणाल्या, गुन्हा सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणांना आधी लाच घेण्यास होकार दिल्याचा गुन्हा सिद्ध करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...