• Home
  • National
  • Corona : 508 cases of infection and 9 deaths; The highest number of 101 cases were reported in Maharashtra

देशात कोरोना व्हायरसमुळे 14 दिवसात 10 जणांचा मृत्यू; लॉकडाउन आणि कर्फ्यू लागू करण्यासाठी पोलिस रस्त्यांवर

  • आंध्र प्रदेशात परदेशातु परतल्यानंतर ट्रॅव्हल हिस्ट्री लपवणाऱ्या लोकांची ओळख झाली, मेडिकल टीम घरोघरी जाऊन टॉप्स करतील. 
  • उत्तराखंड सरकारचे 100 बेड असलेल्या रुग्णालयांना निर्देश: 25% बेड कोरोना संक्रमित आणि संशयितांची ठेवावे

दिव्य मराठी वेब टीम

Mar 24,2020 03:19:03 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरस संक्रमाणाची परिस्थिती गंभीर बनली आहे. संक्रमितांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. मागील 14 दिवसात संक्रमाणामुले 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 7 जणांना शुगर किंवा ब्लडप्रेशरची समस्या होती. महाराष्ट्रात सर्वात जास्त 101 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर केरळ (95) आहे. तसेच मंगळवारी मणिपुरमध्ये संक्रमणाचे पहिले प्रकरण समोर आले. 23 वर्षीय संक्रमित मुलग्गी अशातच ब्रिटनहून परतली होती.

संक्रमण पसरण्यापासून रोखण्यासाठी 30 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पूर्णपणे लॉकडाउनची घोषणा केली आहे. 5 राज्यात कर्फ्यू लावला गेला आहे. देशभरात लॉकडाउन आणि कर्फ्यू लागू करण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. पोलिस बॅरीकेडिंग करून केवळ गरजेच्या कामांसाठी येण्या जाण्याची परवानगी देत आहे. दिल्लीमध्ये सोमवारपासून लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी उल्लंघन करणाऱ्या 1012 लोकांवर केस दाखल केल्या गेल्या. यादरम्यान आंध्र प्रदेश सरकार म्हणाले की, परदेशावून परतलेल्या लोकांची ओळख पावण्यासाठी मेडिकल टीम लोकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहेत.


तीन राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशाने आपल्या अनेक शहरांना लॉकडाउन केले गेले आहे. देशातील 577 जिल्ह्याच्या मर्यादेत येत. तसेच, महाराष्ट्र, पंजाब, पुडुचेरी आणि राजस्थानमध्ये कर्फ्यू लावण्याची घोषणा केली गेली आहे. मध्य प्रदेशाच्या भोपाळ आणि जबलपुरमध्ये सोमवारी रात्रीपासूनच कर्फ्यू लागू केला गेला होता

कझाकिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मायदेशी परतण्याचा आग्रह


कझाकिस्तामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना परत काढण्याचा आग्रह केला आहे. तिथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना सांगितले की, सद्य स्थितीमध्ये फसले आहेत, कारण त्यांचे बुक केलेली उड्डाणे रद्द झाली आहेत. विद्यार्थी एअरपोर्टजवळ भाड्याच्या घरात राहात आहेत, कारण त्यांचे हॉस्टेल एअरपोर्टपासून खूप दूर आहे.

X