आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Affected Patient Dies After Giving Sperm, Wife Had Appealed To Gujarat High Court

गुजरात:कोर्टाच्या परवानगीने स्पर्म सॅम्पल घेतल्यानंतर 30 तासांनी पतीचे निधन, पत्नी म्हणाली-सासरीच राहीन, पुन्हा लग्न करणार नाही

वडोदरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांनी पतीच्या मंजुरीशिवाय स्पर्म देण्यास नकार दिला होता, महिलेने कोर्टात दाखल केला होता अर्ज

‘पतीवर माझे खूप प्रेम आहे. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या मी पूर्ण करेन. पतीच्या इच्छा पूर्ण करणे आता माझी जबाबदारी आहे. मी पुन्हा लग्न करणार नाही. सून म्हणून नाही तर पतीच्या कुटुंबाचा मुलगा होऊन त्यांची काळजी घेईन. सासरच्या मंडळींसोबत राहीन, त्यांना मुलाची उणीव भासू देणार नाही.’ हे म्हणणे आहे मृत्युशय्येवरील पतीच्या अंशापासून मातृत्व सुख मिळ‌वण्याच्या मार्गातील कायदेशीर अडचणींमुळे गुजरात हायकोर्टाचे दार ठोठावणाऱ्या गुजरातच्या महिलेचे.

मंगळ‌वारी गुजरात हायकोर्टाने आयव्हीएफसाठी पतीच्या स्पर्मचे सॅम्पल घेण्यास मंजुरी दिली होती. आदेशानंतर रात्री ८.१५ वाजता रुग्णालयाने सॅम्पल घेतले होते. त्यानंतर सुमारे ३० तासांनी बुधवारी-गुरुवारी मध्यरात्री २.१५ वाजता पतीचे निधन झाले. मूळची अहमदाबादची राहणारी महिला आणि मूळचे भरूच येथील तिचे पती यांची कॅनडात चार वर्षांपूर्वी परस्परांशी ओळख झाली. तेव्हाच दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला. कॅनडाचे स्थायी नागरिकत्व मिळाल्यानंतर दोघांची लग्न करण्याची इच्छा होती, पण दोघांचे कुटुंबीय त्यासाठी तयार नव्हते. वर्षभर विनवण्या केल्यानंतर कुटुंबियांनी परवानगी दिली. लग्नासाठी दोघे भारतात येणार होते, पण त्याआधीच कोरोना संकट सुरू झाले. त्यामुळे गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये दोघांनी नोंदणी विवाह केला. या वर्षी फेब्रुवारीत सासऱ्याला हार्ट अटॅक आल्याने त्यांच्या देखभालीसाठी दोघे मायदेशी परतले होते. वडिलांच्या देखभालीदरम्यानच पतीला कोरोना झाला. फुप्फुसे आणि इतर अवयव फेल झाल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. मेपासून पती व्हेंटिलेटरवरच होता.

चार महिने उपचार, १.५ कोटींचे बिल :
महिलेच्या पतीवर रुग्णालयात चार महिने उपचार सुरू होते. त्यातही दोन महिने त्याला अॅक्मो (ऑक्सिजन) थेरपीवर ठेवले होते. उपचाराचे एकूण बिल १.५० कोटी रुपये झाले आहे. पती ज्या कंपनीत काम करत होता, त्या कंपनीने उपचाराचे बिल देण्यास सहमती दर्शवली आहे.

पती रुग्णालयात कोरोनाशी झुंजत होता, तेव्हा त्याची हिंमत वाढवण्यासाठी पत्नी पीपीई किट घालून पूर्ण वेळ रुग्णालयातच राहत होती. चार महिन्यांपूर्वी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून असेच सुरू होते. गुजरात हायकोर्टाने याचिकेवर सुनावणी करून पत्नीच्या बाजूने आदेश दिला तेव्हा पतीबद्दलचे प्रेम आणि पत्नीच्या समर्पणाची ही कहाणी २० जुलैला समोर आली. आदेशासाठी कलम २२६ मध्ये दिलेल्या अधिकारांचा वापर करण्यात आला. हायकोर्टाच्या इतिहासात प्रथमच असे प्रकरण आले होते. कोर्टाने तत्परता दाखवत फक्त १५ मिनिटांत सुनावणी पूर्ण करून निकाल दिला होता. कोर्टात उपस्थित सर्व लोक आणि न्यायमूर्तीही भावुक झाले होते. सुनेच्या या निर्णयासाठी सासू-सासऱ्यांनी सहमती तर दिलीच शिवाय हायकोर्टात दोघे सहअर्जदारही झाले होते.

बातम्या आणखी आहेत...