आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरात कोरोना संक्रमितांची संख्या 47 हजार 396 झाली आहे. आज पंजाबमध्ये 219, तमिळनाडूत 508, आंध्रप्रदेशात 67, राजस्थानात 66, हरियाणात 31 यांसह 900 पेक्षा अधिक जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याआधी सोमवारी सर्वाधिक 3900 रुग्ण वाढले होते. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात एकूण 67 हजार 711 संक्रमित आहेत. 31 हजार 967 जणांवर उपचार सुरू असून 13 हजार 160 रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1583 मृत्यू झाले आहेत. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 1020 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. संक्रमितांचा रिकव्हरी रेट 27.41% आहे.
दिल्लीतील आर्मी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 24 संसर्गग्रस्त, आयटीबीपीच्या 45 जवानांना कोरोनाची लागण
दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. यामध्ये 20 जवान, एक माजी सैनिक आणि 3 सैनिकांच्या कुटुंबातील लोक आहेत. यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 100 लोकांचा शोध घेतला जात आहे. संसर्ग झालेल्यांना दिल्ली कॅन्टमधील बेस हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. येथे एका नॉन कमीशंड ऑफिसरची 28 वर्षीय मुलगी आली होती. तिला कोरोनाचा संसर्ग झाला होता. तिच्या संपर्कात आल्यामुळे एक डॉक्टर आणि त्यांच्या साथीदारांना कोरोनाची लागण झाली.
दुसरीकडे दिल्लीतच भारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी)चे 45 जवान कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. यातील 43 जण दिल्लीच्या अंतर्गत सुरक्षेत तैनात होते. तर दोन जवान दिल्ली पोलिसांसोबत कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ड्यूटीवर होते.
आयआयटी-जेईई परीक्षांच्या तारखा निश्चित
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने म्हटले की, आयआयटी आणि जेईईची मुख्य परीक्षा 18, 20, 21. 22 आणि 23 जुलै रोजी होईल. तर आयआयटी-जेईई अॅडव्हान्सच्या परीक्षा ऑगस्टमध्ये घेतल्या जातील. याची तारीख नंतर घोषित केली जाईल. नीटची परीक्षा 26 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीचे राहिलेल्या विषयांची परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोना संबंधित इतर महत्वाचे अपडेट
> संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल) ने आयआयटी कानपूरबरोबर मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. ज्या व्हेंटिलेटरसाठी सामंजस्य करार केला आहे तो आयआयटी कानपूरच्या इनक्युबेटेड स्टार्ट-अप, नोक्का रोबोटिक्सने विकसित केला आहे.
> छत्तीसगड सरकारने राज्याच्या ग्रीन झोनमध्ये दारूची होम डिलीव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक 5000 मिलीलीटरपर्यंत मद्याची ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. यासाठी 120 रुपये जादा आकारले जातील.
> तामिळनाडूमध्ये इयत्ता चौथीत शिकणारी मुलगी, तिची बहीण आणि भाऊ यांनी कोरोना आजाराविरोधात लढण्यासाठी सरकारला मदत केली. त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीत गल्ल्यामध्ये जमा केलेले 7000 रुपये दान दिले आहेत. तिन्ही भावडांनी सोमवारी नगरविकास मंत्री एसमी वेलुमणी यांच्या ही रक्कम सुपूर्द केली.
> कायदामंत्री केके यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. यानंतर शास्त्री भवनमधील या इमारतीतील चौथा मजला बुधवारपर्यंत सील केला आहे.
सवलतीच्या लॉकडाऊनमध्ये पहिल्याच दिवशी देशात कोरोनाचीही सर्वात मोठी रांग
देशात कोरोना संसर्ग आता वेगाने पसरतो आहे. सोमवारी बहुतांश जिल्ह्यांतील दुकाने उघडल्याच्या पहिल्याच दिवशी देशात ४२३९ नवे रुग्ण आढळले. ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. देशात आतापर्यंत ४६,०१८ लोक बाधित आहेत. दुसरीकडे, कोरोनाने सर्वाधिक संसर्ग असलेल्या इटली (१३८९), स्पेन (१५३३), जर्मनी (६९७) आणि फ्रान्स (२९७) या देशांत एकाच दिवसात ३९१६ रुग्ण आढळले, जे भारतापेक्षा ३२३ ने कमी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.