आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Attacks Respiratory System, Pranayama Helps Strengthen Immune System, PM Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस:कोरोना श्वसन तंत्रावर हल्ला करतो, प्राणायाम इम्यून सिस्टम मजबूत करण्यास मदत करते, आपले काम शिस्तीत करणे हा देखील योग - पंतप्रधान मोदी 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • योगाने आपल्याला आत्मविश्वास देखील मिळतो - मोदी

आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने पंतप्रधान मोदी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिवस एकप्रकारे एकजुटीचा दिवस आहे. हा दिवस जगाला बंधुत्त्वाचा संदेश देतो. कोरोनाच्या या संकटादरम्यान जगभरातील लोकांमध्ये या दिवसाविषयी उत्साह आहे. 

21 जून 2014 रोजी योग दिवसाची सुरुवात झाली होती. यंदाच्या योग दिनाची थीम 'योगा फॉर हेल्थ, योगा फ्रॉम हेल्थ' आहे. आयुष मंत्रालयाने लेहमध्ये एक मेगा कार्यक्रम घेण्याची योजना आखली होती, परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे ती रद्द करण्यात आली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण समूह कार्यक्रमांपासून दूर आहोत आणि कुटुंबातील सदस्यांसह घरी योग करत आहोत. जेव्हा कुटुंबातील प्रत्येकजण एकत्र येतो. तेव्हा तेथे  ऊर्जेचा संयोग होतो. कौटुंबिक बॉन्डिंग वाढवण्याचाही हा दिवस आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे जगाला योगाची गरज पूर्वीपेक्षा जास्त जाणवत आहे.

मोदी म्हणाले- योगामुळे आपल्याला आत्मविश्वास मिळतो

पंतप्रधान म्हणाले, 'कोरोना आपल्या श्वसन प्रणालीवर हल्ला करतो. प्राणायाम हे श्वसन प्रणाली मजबूत करण्यात सर्वात जास्त मदत करते. प्राणायाम करण्याचे बरेच प्रकार आहेत. जर तुम्ही प्राणायामच्या जाणकारांकडे गेलात तर त्याचे किती प्रकार आहेत ते तुम्हाला सांगतील. अनुलोम-विलोम, भ्रामरी इत्यादी. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात मदत मिळते. आपल्या दैनंदिन अभ्यासामध्ये प्राणायामांचा समावेश करायला हवा. अनुलोम-विलोमसोबतच इतर पद्धती शिकण्याचा प्रयत्न करा. योगामुळे कोरोना रोगाचा पराभव करण्यात लोकांना मदत होत आहे. योगाने आपल्याला आत्मविश्वास देखील मिळतो. यामुळे आपण तणावातून मुक्त होऊ शकतो. हे आपल्याला मानसिक शांततेसह आणि संयम सहनशक्तीही देते. 

बातम्या आणखी आहेत...