आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Causes Lockdowns Updates: Why Not Ban Campaign Rallies In Election; News And Live Updates

सवाल:कोरोनामुळे लॉकडाऊन होतो, व्यवसाय बंद होऊ शकतात, परीक्षा रद्द होतात मग...प्रचारसभांवर संपूर्ण बंदी का नाही?

​​​​​​​कोलकाता9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संध्या. 7 नंतर सभांना बंदी... कोरोना काय संध्याकाळीच फैलावतो का?
  • कोरोनाने काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू, अन्य पक्षांचे ३ उमेदवार कोरोनाग्रस्त

बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी २७ मार्चपासून सुरू झाली. मात्र जानेवारीपासूनच तयारी सुरू होती. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीदिनी मोदी-ममतांची आगपाखड सर्वांच्याच लक्षात आहे. मात्र तेव्हा कोरोना आटोक्यात होता. १५ जानेवारीला राज्यात ६२३ नवे रुग्ण सापडले होते. २७ मार्चला ८१२ रुग्ण वाढले, ते नंतर थांबलेच नाही. बंगालने २२ ऑक्टोबर २०२० मधील मागील पीक केव्हाच पार केला आहे. तेव्हा एका दिवसात ४१५७ नवे रुग्ण आढळले होते. १५ एप्रिलला नवे रुग्ण रुग्ण ६७६९ झाले. तरीही राज्यात बिनबाेभाट प्रचारसभा सुरूच आहेत. काँग्रेसच्या एका उमेदवाराचे कोरोनाने निधन झाले आहे. विविध पक्षांचे ३ उमेदवार कोरोनाग्रस्त आहेत.

शुक्रवारी ममता बॅनर्जी तसेच भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सभा, रोड शो घेतले
शुक्रवारी ममता बॅनर्जी तसेच भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सभा, रोड शो घेतले

कोरोना सभांना ही मुभा का?

  • 1 एप्रिल, 2021 पर्यंत 1274 नवे काेराेनाबाधित रुग्ण आढळले होते.
  • 15 एप्रिल, 2021 पर्यंत 6769 नवे रुग्ण. बंगालने मागील पीक केव्हाच गाठला

जनतेच्या काळजीच्या नावाने फक्त बोलंदाजी अन् आयोगाची अपुरी इच्छाशक्ती
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाचा हवाला देत उर्वरित टप्प्यांतील मतदान एकाच वेळी घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली. बाहेरील लोकांवर बंदीचीही मागणी केली. मात्र त्यांच्या सभा सुरूच आहेत. शुक्रवारी ममता बॅनर्जी तसेच भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सभा, रोड शो घेतले. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने सभांवर बंदी आणली, मात्र संध्याकाळी ७ वाजेनंतरच्या. दिवसा सभांना पूर्णपणे मोकळीक आहे.

बातम्या आणखी आहेत...