आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Causes Stiffness In Lungs, Gujarat Doctors Claim After Autopsy Report Of 6 Patients

दिव्य मराठी विशेष:कोरोनामुळे फुप्फुसांत येतोय कडकपणा, 6 रुग्णांच्या ऑटोप्सी अहवालानंतर गुजरातच्या डॉक्टरांचा दावा

राजकाेटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीबीत फुप्फुसाचा वरचा, तर न्यूमोनियात खालचा भाग होतो कडक, कोरोनात गंभीर स्थिती

काेराेनाचा परिणाम मानवी फुप्फुसावर अंतर्बाह्य स्वरूपात दिसून येत आहे. त्यामुळेच संसर्गानंतर फुप्फुस दगडासारखे कठाेर हाेत असल्याचा दावा राजकाेटच्या पीडीयू मेडिकल काॅलेजच्या फोरेन्सिक सायन्स विभागातील तज्ञांनी केला. काेराेनाच्या सहा मृतांच्या आॅटाेप्सी अहवालानंतर प्राथमिक निष्कर्षांत डाॅक्टरांनी असे म्हटले आहे.

डाॅक्टर म्हणाले, टीबी व न्यूमाेनियापेक्षा काेराेनाचा परिणाम फुप्फुसांवर जास्त हाेत असल्याचे दिसून येत आहे. साध्या पद्धतीने समजून घ्यायचे झाल्यास ताज्या ब्रेडपेक्षा जास्त नरमपणा मानवी फुप्फुसांत असताे. या संरचनेमुळेच ते आॅक्सिजन व कार्बन डायआॅक्साइडची देवाणघेवाण करू शकतात. फुप्फुसे कडक झाल्यास त्यास मेडिकलच्या परिभाषेत फायब्राेसिस असे संबाेधले जाते. परंतु अशा स्थितीची अन्य कारणे व प्रकारही आहेत. मात्र, काेराेना पीडितामध्ये अशी स्थिती पहिल्यांदाच एवढ्या तीव्रतेेने पाहायला मिळाली आहे. मानवी फुप्फुसात पाच खंड असतात. डाव्या बाजूला दाेन व उजव्या बाजूला तीन. सामान्यपणे फायब्राेसिसची समस्या डाव्या बाजूला हाेते. टीबी रुग्णांत फुप्फुसाचा वरचा, तर न्यूमाेनियात खालच्या भागात समस्या दिसते. काेराेनाच्या रुग्णांत मात्र फुप्फुसाच्या पाचही भागांत अशी समस्या दिसून आली.

काेणत्याही विषाणूचा पहिल्यांदा फुप्फुसावर हाेताे परिणाम

फाॅरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डाॅ. हेतल कयाडा म्हणाले, मृतदेहातील फुप्फुस काढण्यात आले तेव्हा ते दगडासारखे कठाेर वाटू लागले. काेणत्याही विषाणूचा सामना करण्याचे काम शरीराची राेगप्रतिकार यंत्रणा करते. परंतु त्याचा पहिला परिमाण फुप्फुसांवर हाेताे. विषाणू व राेगप्रतिकारशक्तीच्या लढाईचा परिणाम हा पेशींच्या देखभालीवर हाेताे. त्यामुळे नसांमध्ये द्रव्य साठवू लागते. त्याचा फुप्फुसाची कार्यक्षमता व काेमलतेवर परिणाम हाेत असताे. त्यालाच फायब्राेसिस म्हटले जाते. त्यामुळेच पीडित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागताे. तिला पुरेसा आॅक्सिजन मिळत नाही. तूर्त तरी फायब्राेसिसचे खरे कारण व संसर्ग इत्यादी माहिती संशाेधनानंतर स्पष्ट हाेणार आहे.