आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात 3.82 लाख रुग्णांची वाढ, हा आकडा अमेरिकेत आढळलेल्या नवीन संक्रमितांपेक्षा 9 पट जास्त

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चांगली बाब म्हणजे, चोवीस तासात 3.37 लाख रुग्ण ठीकदेखील झाले

देशात कोरोनाची दुसरी लाट थांबायचे नावच घेत नाहीये. 3 दिवस नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती, पण मंगळवारी पुन्हा संक्रमितांचा आकडा वाढला. देशभरात मागील 24 तासात 3 लाख 82 हजार 602 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जगातील सर्वाधिक संक्रमित देश अमेरिकेत आढळलेल्या नवीन संक्रमितांच्या नऊ पट आहे.

दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासात देशभरात सर्वाधिक 3,783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे, मागील चोवीस तासात 3.37 लाख रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. हा आकडा आतपर्यंतचा सर्वाधिक आहे.

देशातील कोरोना महामारीची आकडेवारी

  • 24 तासात सापडलेले नवीन रुग्ण: 3.82 लाख
  • 24 तासात झालेले मृत्यू: 3,783
  • 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 3.37 लाख
  • एकूण संक्रमितांची संख्या: 2.06 कोटी
  • आतापर्यंत ठीक झालेले रुग्ण: 1.69 कोटी
  • आतापर्यंत झालेले मृत्यू: 2.26 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची एकूण संख्या: 34.84 लाख
बातम्या आणखी आहेत...