आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Death Compensation Latest News Update | Centre Filed Affidavit, Corona Cases In India, Corona Death In India, Coronavirus Outbreak

सर्वोच्च न्यायालयात सरकारचे प्रतिज्ञापत्र:कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना 4 लाखांची भरपाई देता येणार नाही-केंद्र सरकार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राचा युक्तिवाद- एका आजारामुळे मृत्यू झाल्यास भरपाई आणि दुसर्‍या आजारामुळे झाल्यावर नाही, हे योग्य नव्हे

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देता येणार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सरकारने म्हटले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातलगांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देऊ शकत नाही. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत फक्त नैसर्गिक दुर्गटना जसे भूकंप, पूर इत्यादींमध्ये नुकसान भरपाई देता येते. सरकारचे म्हणने आहे की, कोरोना आजारात नुकसान भरपाई देणे आणि इतर आजारात नाही. हे योग्य होणार नाही.

नुकसान भरपाई दिल्यास राज्यांचा फंड संपेल

183 पानांच्या एफिडेविटमध्ये केंद्राने म्हटले की, अशाप्रकारची नुकसान भरपाई राज्यांकडे असलेल्या स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फंड (SDRF) मधून होत असते. प्रत्येक मृत्यूसाठी चार लाख रुपये देण्याचे ठरल्यास, राज्यांचा फंड संपून जाईल. यामुळे कोरोनासह इतर नैसर्गिक दुर्घटांनांचा सामना करण्यास अडचणी येतील.

सरकारचा युक्तीवाद

  • कोरोनामुळे आतापर्यंत 3.85 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले. हा आकडा येणाऱ्या काळात अजून वाढू शकतो. त्यामुळे या सर्वांना नुकसान भरपाई दिल्यावर येणाऱ्या काळात अडचणी येऊ शकतात.
  • यंदा केंद्र आणि राज्यांना महसुल कमी मिळाला आहे. अशा काळात कोरोना मृतांना 4-4 लाख रुपये देणे शक्य नाही.
  • या आर्थिक वर्षात राज्यांना 22,184 कोटी रुपये SDRF मध्ये दिले. यातील मोठी रक्कम कोरोनावर खर्च होत आहे. केंद्राने 1.75 लाख कोटी रुपयांचे पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज घोषित केले आहे. यात गरिबांना मोफत राशन, वृद्ध, दिव्यांग, असमर्थ महिलांना थेट पैशांची मदत, 22.12 लाख फ्रंटलाइन कोरोना वर्कर्सला 50 लाख रुपयांचा इंश्योरेंसचा यात समावेश आहे.

पुढील सुनावणी 21 जूनला
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासंबंधी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. याचिकेत केंद्र आणि राज्य सरकारांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर 4 लाख रुपये भरपाई देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या म्हणजेच 21 जूनला होईल.

बातम्या आणखी आहेत...