आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Death Cross 1.50 Lakhs In India; Third Country In The World With The Highest Number Of Deaths

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनामुळे भारतात दिड लाख मृत्यू:सर्वाधिक मृत्यूच्या यादीत तिसऱ्या स्थानी; चांगल्या उपचारामुळे 4 महीन्यात 30 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा जीव वाचला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 1.4% रुग्णांचा मृत्यू झाला

भारतासाठी एक वाईट बातमी आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. जगात सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. पण यात एक चांगली बातमीदेखील आहे. मागील 4 महीन्यात चांगल्या उपचारामुळे 30 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा जीव वाचला आहे

सप्टेंबरपर्यंत देशात दररोज 1000 ते 1300 रुग्णांचा मृत्यू व्हायचा. परंतु, आता यात खूप कमतरता आली आहे. आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक 32 हजार 246 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये हा आकडा 22 हजार 344 वर आला. नोव्हेंबरमध्ये 15 हजार 17 आणि डिसेंबरमध्ये 10 हजार 858 रुग्णांचा जीव गेलाआहे. या तीन महिन्यात मृतांच्या आकड्यात 23% कपात झाली आहे.

आतापर्यंत 1.4% रुग्णांचा मृत्यू झाला

देशात आतापर्यंत 1.4% कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा जगातील सर्वाधिक मृत्यू झालेल्या 10 देशांपेक्षा सर्वात कमी आहे. अमेरिकेत 1.69% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक डेथ रेट मॅक्सिकोचा आहे. येथे 8.77% रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...