आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसर्गाचा भयावह फैलाव:भारतात कोरोनाचे मृत्यू पाचपट अधिक; संख्या लपवण्यासाठी राज्यांवर दबाव

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसर्गाचा भयावह फैलाव झाल्याची खरी स्थिती सरकारे दाखवतच नाहीत

जेफ्री जंटलमन/समीर यासिर/हरिकुमार/सुहासिनी राज
भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे रूपांतर भयानक संकटात झाले आहे. रुग्णालये भरली आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हताश रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडत आहेत. मृतांची प्रत्यक्षातील संख्या सरकारी आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे. जगातील जवळपास निम्मे रुग्ण भारतात आढळत आहेत. तज्ञांच्या मते, संसर्गाचे खरे चित्र समोर आणले जात नाही. दरम्यान, काही समीक्षकांच्या मते, खरी संख्या लपवण्यासाठी राज्य सरकारांवर केंद्राचा दबाव आहे.

अहमदाबादमध्ये एका स्मशानभूमीत चोवीस तास चिता ज‌ळत आहेत. तेथे काम करणारे सुरेशभाई यांनी सांगितले की, आम्ही मृतांच्या नातेवाइकांना ज्या पेपर स्लिप देतो त्यात मृत्यूचे कारण लिहीत नाही. अधिकाऱ्यांनीच तसे निर्देश दिले आहेत. भारताच्या स्थितीवर लक्ष ठेवून असलेले मिशिगन विद्यापीठाचे महामारी तज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले की, आम्ही जेवढे मॉडेल बनवले आहेत त्याच्या आधारे आम्ही खात्रीने सांगू शकतो की, मृतांची जेवढी संख्या दाखवली जात आहे त्यापेक्षा दोन ते पाचपट जास्त मृत्यू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी भारताची स्थिती चांगली होती.

वाईट दिवस संपले आहेत असा विचार करून अधिकारी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगणे सोडून दिले. आता असंख्य भारतीय सोशल मीडियावर रुग्णालय, बेड, औषधे, ऑक्सिजन मिळावा यासाठी हृदयविदारक मेसेज करत आहेत. वृत्तपत्रांत राष्ट्रीय आणीबाणीसारखे मथळे येत आहेत. देशभरात सामूहिक अंत्यसंस्कार होत आहेत. अनेक चिता एकाच वेळी पेटल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, भारताची लसीकरण मोहीम थंडावली आहे. जगातील प्रमुख लस उत्पादक देश असूनही आतापर्यंत फक्त १० टक्के भारतीयांचेच लसीकरण झाले आहे.

गुजरातेत मृत्यू सहापट कमी दाखवले : वायूगळती दुर्घटना अनुभवलेल्या भोपाळचे लोक सांगतात, त्या दुर्घटनेनंतर प्रथमच स्मशानांत गर्दी दिसत आहे. एप्रिलच्या मध्यात अधिकाऱ्यांनी कोरोनाचे मृत्यू ४१ सांगितले. मात्र, कब्रस्तान आणि स्मशानांच्या सर्व्हेत या काळात १ हजारावर अंत्यसंस्कार कोविड प्रोटोकॉलनुसार झाल्याचे दिसून आले. हीच स्थिती गुजरात आणि उत्तर प्रदेशातील आहे. गुजरातमध्ये या काळात सरासरी ६१० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते.

छत्तीसगडमध्ये आकडेवारी भिन्न : काँग्रेसशासित या राज्यात अधिकाऱ्यांनी १५ ते २१ एप्रिलदरम्यान कोरोनामुळे १०५ मृत्यू झाल्याचे सांगितले. राज्य सरकारने दुर्गमध्ये मृतांची संख्या निम्मीच सांगितली. यावर आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव म्हणाले, आम्ही पारदर्शकता ठेवली आहे.

बातम्या आणखी आहेत...