आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Diagnostic Kit Made In The Country; The Cost Comes To About Two And A Half Thousand Rupees; New Machine Can Have Tests In 1 Thousand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शोध:देशात तयार झाले कोरोना निदान करणारे किट; खर्च येतो सुमारे अडीच हजार रुपये; नव्या मशीनमध्ये 1 हजारात होऊ शकेल टेस्ट

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 10 मिनिटांत रिझल्ट, सध्या लागताहेत दोन तास

अनिरुद्ध शर्मा

देशातील प्रयोगशाळेत कोविड-१९चे चाचणी करणारे किट विकसित करण्यात आले आहे. केवळ १० मिनिटांत यातून रिझल्ट मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. या टेस्टसाठी अगोदर स्क्रीनिंगचीही गरज राहणार नाही. याला मंजुरी मिळावी म्हणून आयसीएमआरकडे पाठवण्यात आले आहे. या मशीनची किंमत सुमारे अडीच लाख असून नमुना तपासणीसाठी १ हजार रुपये खर्च येईल. 

आजवर देशातील मान्यताप्राप्त विशेष सरकारी व खासगी लॅबमध्ये पीसीआर (पॉलिमर चेन रिअॅक्शन) तंत्रज्ञानाने कोविड-१९ची चाचणी होत आहे. यासाठी प्रती चाचणी अडीच हजार रुपये खर्च येत आहे. पीसीआर मशीनसाठी सुमारे २५ लाखांची गुंतवणूक करावी लागते. 

सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित तिरुवनंतपुरम येथील श्रीचित्रा (डीएसटी) या संस्थेने तीन आठवड्यांत हे टेस्टिंग किट विकसित केले असून  सार्स कोव्ह-२च्या एन-जीन यात तपासले जाईल. या किटला चित्रा जीन लँप-एन असे नाव देण्यात आले आहे. 

डीएसटीचे सचिव प्रो. आशुतोष शर्मा यांनी सांगितले की, नव्या मशीनमधून एका वेळी ३० नमुने तपासले जाऊ शकतात. म्हणजे एका दिवसात अनेक नमुने तपासता येतील.

बातम्या आणखी आहेत...