आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाशी लढाई सुरू आहे. त्यातून आतापर्यंत ३५ लाख लोक बरे झाले आहेत. पण चिंतेची बाब म्हणजे एकदा का संक्रमित व्यक्तीच्या फुप्फुसांपर्यंत कोरोनाचा विषाणू पोहोचला तर तो गंभीर परिणाम करतो. महिनाभर संक्रमित राहिलेल्या व्यक्तीच्या फुप्फुसांचे तो कायमस्वरूपी नुकसान करू शकतो. एखादी व्यक्ती २५ वर्षे सिगारेट ओढत असेल तर तिच्या फुप्फुसांचे जेवढे नुकसान होते तेवढेच नुकसान कोरोना एक महिन्यात पोहोचवू शकतो. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यावर सर्व काही ठीक झाले असे मानणे योग्य नाही.
दीर्घकालीन उपचारानंतर बरे झालेल्यांच्या फुप्फुसांना कायमची हानी होऊ शकते. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोरोना फुप्फुसांशी संबंधित रोग आहे, तो धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो.
तुमचे प्रश्न-तज्ञ डॉक्टरांची उत्तरे
फुप्फुसांचे ४०% नुकसान होते तेव्हा श्वास घेण्यास अडचण सुरू होते...
- फुप्फुसांना झालेले नुकसान केव्हा गंभीर होते?
सीटी स्कॅनमध्ये फुप्फुसांना ६०% नुकसान दिसले तर ते गंभीर आहे. तेव्हा आयसीयूत काळजी घेणे गरजेचे.
- कोरोना फुप्फुसांना कायमची हानी पोहोचवू शकतो ?
ते फुप्फुसांत न्युमोनियाचे कारण ठरते. गंभीर परिणाम झाल्यास फुप्फुसांवर कायमचे डाग पडू शकतात.
- कोरोनामुळे फुप्फुसांची क्षमता प्रभावित होते का?
अंतर्गत पेशींची हानी होते. श्वास घेण्याची क्षमता ५ हजार घन सेंमीहून ३-४ हजारपर्यंत घसरू शकते.
फुप्फुसांच्या भिंतीवर हल्ला होतो, वायुकोश १२ महिन्यांत दुरुस्त होते
कोरोनामुळे फुप्फुसांची भिंत फाटते. त्याने ऑक्सिजनचा प्रवाह बाधित होतो. त्यामुळे पांढरे डाग पडतात. नुकसानग्रस्त वायुकोश दुरुस्त होण्यास १२ महिनेही लागू शकतात. को-मॉर्बिड रुग्णाला वेळीच ऑक्सिजन, औषधे मिळाल्यास त्वरित दिलासा मिळू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.