आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Drug Molnupiravir Central Regulatory Approval; Odisha, However, Banned | Marathi News

कोरोना औषध:मोलनुपिराविरला केंद्रीय नियामकाची मंजुरी; ओडिशाने मात्र बंदी घातली, नॅशनल टेक्निकल प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट करण्यावर एकमत नाही

नवी दिल्ली / पवनकुमारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मोलनुपिराविर या कोरोना संसर्गावरील उपचारासाठीच्या औषधाच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी ओडिशा सरकारच्या औषध नियामकाने मात्र याची विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. राज्य सरकारनुसार, राज्यात स्थापन विशेष समितीच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या नियामकाने म्हटले आहे की, औषध पूर्णपणे सुरक्षित आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याच्या वापरावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली जावी. दुसरीकडे, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनचे (सीडीएससीओ) म्हणणे आहे की, कोणत्याही नव्या औषधांची सुरक्षा-प्रभाव तपासण्याचे व वापराला परवानगी देण्याचे काम केंद्र सरकारचे आहे.

देशाचे माजी ड्रग्ज कंट्रोलर जनरल डॉ. जी. एन. सिंह यांच्यानुसार एखाद्या राज्याने अशा औषधावर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्य अशी बंदी घालू शकत नाही.

जोखीम आहे, पण सतर्क राहा : भार्गव
आयसीएमआरचे महासंचालक प्रा. बलराम भार्गव म्हणाले की, मोलनुपिराविर अँटिव्हायरल औषधाला नॅशनल टेक्निकल प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाच्या तज्ज्ञांच्या अनेक बैठका झाल्या, पण अद्याप एकमत होऊ शकले नाही. औषधाचे काही साइड इफेक्ट्स असल्याची माहिती आहे, तर काही साइड इफेक्ट्सबाबत अद्याप माहिती नाही हे खरे आहे.

देशात २.६९ लाख नवे रुग्ण
नवी दिल्ली | शुक्रवारी देशात कोरोनाचे २,६९,४४६ नवे रुग्ण आढळले. एक दिवसापूर्वीपेक्षा ही संख्या सुमारे ५ हजारांनी अधिक आहे. तर, २१९ लोकांचा मृत्यू झाला. अर्थात काही मोठ्या राज्यांत आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी ४३,२११ नवे रुग्ण आढळले. ही संख्या गुरुवारच्या तुलनेत ३,१९५ने कमी आहे. दिल्लीत २४,३८३ (गुरुवारी २८,८६७) तर गुजरातमध्ये १०,०१९ (गुरुवारी ११,१७६) नवे रुग्ण आढळले.

राज्यांचा बंदीचा अधिकार चर्चेत
डीसीजीआयने एखाद्या औषधाला मंजुरी दिल्यानंतर त्याचा वापर करणे साधारणपणे सर्व राज्यांना क्रमप्राप्त असते. किंबहुना, हा एक नियम म्हणून राज्यांनी तो स्वीकारलाच पाहिजे, असे संकेत आहेत. मात्र, ओडिशाने मोलनुपिराविर औषधावर बंदी जाहीर करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

भारतातही सध्या काही अटींसह परवानगी
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) प्रा. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, या औषधाला काही देशांत परवानगी मिळाली आहे. अमेरिकेत काही अटींसह वापराची परवानगी आहे. भारतीय नियामकानेही अटींसह वापरास परवानगी दिली आहे, पण काही ठिकाणी बेधडक वापर होत आहे, ते ठीक नाही. १८ वर्षांखालील व्यक्तींना, गर्भवती महिलांना हे औषध देऊ नये, हे निर्देश आहेत.