आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Corona | Drugs | Courier Drugs | Marathi News | During The Corona Period, Drug Trade By Parcel, Courier Increased By 250 Percent

डार्कनेटवर अमली पदार्थांच्या व्यापारामुळे चिंता:कोरोनाकाळात पार्सल, कुरिअरने ड्रग्जचा व्यापार 250 टक्के वाढला

मुकेश कौशिक | नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

सायबर गुन्हेगारी व सायबर हल्ल्यांसाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डार्कनेट देशात अमली पदार्थांचा व्यापार करत आहेत. त्यामुळे देशात सर्वात मोठा ड्रग्ज अड्डा तयार होत आहे. तपास संस्था डार्कनेटवर लक्ष ठेवत आहे. डार्कनेट तरुणांना मोठ्या संख्येने सामील करण्याचा प्रयत्न करत आहे का? यावरही निगराणी ठेवली जात आहे.

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या म्हणण्यानुसार डार्कनेटवरून झालेला ७४ टक्के व्यवहार हा अमल पदार्थ तस्करीशी संबंधित होता, हे दिसून आले आहे. अंधारातील या व्यापारापैकी ९० टक्के भाग ड्रग्जचा होता. षड्यंत्र करणाऱ्या या जगाचा सर्वात भयंकर पैलू म्हणजे यात तरुण गुरफटले जाऊ लागले आहेत. त्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर आहे. कारण तरुण तंत्रज्ञानात रस घेतात. सायबर गुन्ह्यांतील जवळपास सर्व खटल्यात इंटरनेट गॅजेटचा वापर केल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकरणांची मुळे डार्कनेटपर्यंत जात असल्याचे स्पष्ट होते.

डार्कनेट व्यतिरिक्त इन्क्रिप्टेड कम्युनिकेशन्स, मेसेंजर्स, इलेक्ट्रॉनिक-व्हर्च्युअल पेमेंट सिस्टिमद्वारे देखील ड्रग्सचा व्यापार केला जात आहे. कोरोनाकाळात ड्रग्जची तस्करी पार्सल, कुरिअरनेदेखील होत होती. त्यामुळे ऑनलाइन रिटेलिंग, वितरणाच्या क्षेत्रात डार्कनेटचा वापर वाढेल, असे कंपनीला वाटते. त्याशिवाय ड्रग्जची देवाण-घेवाण देखील होऊ शकते.एनसीबीचे महासंचालक एन.एन. प्रधान म्हणाले, डार्कनेटचा पुरवठा समुद्र मार्गे वाढू लागला आहे. गेल्या आठवड्यात एनसीबीने टाकलेल्या छाप्यात ड्रग्ज मोठ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला. या प्रकरणी २२ जणांना अटक झाली होती.

एनसीबी, दलाने पकडले 2200 किलो ड्रग्ज

 • 2019 1510 किलो
 • 2020 110 किलो
 • 2021 637 किलो

कोविडनंतर ड्रग्जच्या व्यापाराचा नवा ट्रेंड

 • जहाज, खासगी विमानांचा वापर वाढला
 • ग्राहकापर्यंत काँटॅक्टलेस डिलिव्हरीवर भर
 • या तीनही बाबतीत डार्कनेटची भूमिका महत्त्वाची ठरते.
 • तरुणांच्या साह्याने पाळेमुळे खणण्याचे तपास संस्थेचे प्रयत्न
 • इनॅक्टिव्ह किंवा व्यवहार संपलेल्या डार्कनेटला कॅटलॉगमधून काढून टाकणे
 • ड्रग्ज विक्रीचा कॅटलॉग व हालचालींची नोंद ठेवावी.
 • नवे डार्क नेटवर्क अस्तित्वात येताच तपास संस्थांचे त्यांच्यावर वर्चस्व असावे.
 • डार्कनेटवर कोणत्या ड्रग्जची किती दरात विक्री केली जाते. त्याचे विश्लेषण करावे. त्याचे वर्गीकरण करावे.
बातम्या आणखी आहेत...