आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Effect | Amid Lockdown, Companies Like Reliance Industries, Goldman Sachs, Samsung Are Offering Online Internship Opportunities To Youth

दिव्य मराठी विशेष:टाळेबंदीत रिलायन्स इंडस्ट्रीज, गोल्डमेन सॅक्स, सॅमसंगसारख्या कंपन्यांची ऑनलाइन इंटर्नशिपची संधी, कंपनीची आभासी फेरीही

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत, निवड झालेल्यांना वर्क फ्रॉम होमची संधी

कोरोना विषाणू उद्रेकात घरांत कैद झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कंपन्या आभासी इंटर्नशिपची सुविधा देत आहेत. विद्यार्थी घरातूनच कंपन्यांसाठी इंटर्नचे काम करत आहेत. कंपन्या त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज समजावत आहेत आणि ऑफिसची ऑनलाइन टूरही घडवली जात आहे. एवढेच नव्हे तर घरातून कामादरम्यान त्यांची नाेकरीही निश्चित केली जात आहे.

एका अहवालानुसार, अव्वल बिझनेस स्कूल्स आणि आयआयटीच्या कमीत कमी ५०० पदवीधर व्हर्ज्युअल इंटर्नशिपसाठी निवडले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, सॅमसंग, भारती एअरटेल, एबी इनबेव, गोल्डमेन सॅक्स आणि जेपी मार्गनसारख्या कंपन्या इंटर्नच्या इंडक्शनपासून रिअल टाइम प्रोजेक्ट्सही देत आहेत. ते ई-मेंटरिंग सत्रांसोबत इंटर्नना ऑन बोर्ड करत आहेत. काही कंपन्या शिकण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल कंपनी टूर करवत आहेत. असे असले तरी मुलाखतीसाठी कॉल क्वॉलिटी, बँडविड्थ, डिव्हाइस क्वॉलिटी, लायटिंग, एंबियंट नॉइज आणि बॅकग्राउंड डिस्ट्रक्शन व्हिडिओ आव्हाने समोर येत आहेत. एमवे इंडियाचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी शंतणू दास म्हणाले, कंपनीने नव्या इंटर्नसाठी व्हर्च्युअल वॉक द फ्लोरचे आयोजन केले आहे. गोल्डमेन साक्सने सोमवारपासून ९८ इंटर्नची इंटर्नशिप सुरू केली. याआधी कंपनीने या वर्षी एकूण ७०० पेक्षा जास्त इंटर्न नियुक्त केले. जेपी मॉर्गनने सुमारे १५० इंटर्नची इंटर्नशिप केली.

सॅमसंगने या सत्रात बी-स्कूल्समधून ३६ इंटर्नना संधी दिली. सॅमसंग इंडियाने सांगितले की, इंटर्नच्या या बॅचला तंत्रज्ञान अाणि नवोन्मेषातून सर्वकाही शक्य असल्याचे शिकवले जाईल. एका लिंक्डइन पोस्टमध्ये रिलायन्सने सांगितले, व्हर्च्युअल रिलायन्स प्रोग्रामअंतर्गत ८४ इंटर्नची निवड केली.

व्हर्च्युअल मुलाखतीत ७५% पेक्षा जास्त वाढ

व्हर्च्युअल नियुक्तीसाठी कंपन्या गुगल हँगआऊट कॉल्स, मायक्रोसॉफ्ट टीम आणि झूम अॅपची मदत घेतली जात आहे. भरती फॉर्म इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग अँड इंजिनिअरिंग अँड जनरल स्टाफिंग, टीमलीज सर्व्हिसेस लिमिटेडचे बिझनेस हेड, सुदीप सेन म्हणाले, टाळेबंदीदरम्यान व्हर्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...