आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Corona Effect: The Online Market For Second hand Clothes Is Growing At A Rate Of 27%

दिव्य मराठी विशेष:कोरोना इफेक्ट : जुन्या कपड्यांची ऑनलाइन बाजारपेठ २७ टक्के दराने वाढतेय, या वर्षी बाजारपेठ ६८ हजार कोटींपर्यंत पोहोचणार

ब्लूमबर्ग। नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थ्रेडअपने रिसर्च फर्म ग्लोबल डेटासोबत या क्षेत्रावर दिला आपला वार्षिक अहवाल
  • कोरोना इफेक्ट : जुन्या कपड्यांची ऑनलाइन बाजारपेठ २७ टक्के दराने वाढतेय, या वर्षी बाजारपेठ ६८ हजार कोटींपर्यंत पोहोचणार

कोरोना संकटाने लोकांच्या आरोग्यासोबत बहुतांश व्यवसायाचेही जास्त नुकसान झाले आहे. दुसरीकडे, काही अशी क्षेत्रेही आहेत, ज्यांची गाडी कोरोनामुळे चालू शकली नाही. जुन्या कपड्यांचा ऑनलाइन बाजाराही त्यापैकी एक आहे. जुन्या कपड्यांच्या ऑनलाइन रिसेलची मोठी कंपनी थ्रेडअपने रिसर्च फर्म ग्लोबल डेटा रिटेलसोबत मिळून या क्षेत्राबाबत आपला अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, जुन्या कपड्यांचा रिसेल ऑनलाइन बाजार २७% वेगाने वाढत या वर्षी ६८ हजार कोटी रुपयांपर्यंत पाेहोचला आहे. २०२४ पर्यंत याच्या बाजारपेठेचा आकार येत्या पाच वर्षांत ४.८४ लाख कोटी रुपयांचे होईल. अहवालानुसार, रिसेल मार्केट गेल्या वर्षी सर्वसाधारण रिटेल बाजारापेक्षा २५ पट जास्त वेगाने वाढत आहे. २०१९ मध्ये सलग ६.४० कोटी लोकांनी जुने कपडे खरेदी केले. गेल्या काही वर्षांत रिसेल मार्केट तेजीने वाढत होती, मात्र कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन झाले. लोकांचे उत्पन्नही कमी झाले. परिणामी रिसेलची ऑनलाइन बाजारपेठ आणखी वेगाने वाढली आहे. असे असले तरी रिसेलचा ऑफलाइन बाजाराही जास्त मोठा आहे, मात्र कोरोनामुळे या वर्षी त्यांची वृद्धी थांबली आहे. २०१९ मध्ये ऑनलाइन रिसेल मार्केट ५३ हजार कोटी रुपये होती. दुसरीकडे, ऑफलाइन मार्केट १.५८ लाख कोटी रुपयांचे होते. कोरोनामुळे ऑफलाइन बाजार जवळपास एक तृतीयांश घटण्याचा अंदाज आहे.

थ्रेडअपचे सीईओ जेम्स रेनहार्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, एक वेळ जेव्हा लोक चांगली वस्तू ८०% कमी किमतीवर खरेदी करत होते तेव्हा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलतो. यानंतर लोक रिटेल शॉप किंवाविक्रीत खरेदीदारीमुळे त्याची तुलना करतात. या कारणामुळे रिसेल बाजारपेठ तेजी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...