आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामाराशी सामना करण्यासाठी हा लॉकडाउन गरजेचा आहे, पण यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास मजुरांना सोसावा लागत आहे. कोणाला वेळेवर अन्न मिळत नाहीये, तर कोणी आपल्या कुटुंबापासून दूर अडकून पडला आहे. त्यांची व्यथा एकणारा कोणीच नाही.
1) चप्पल मिळाल्यानंतर चिमुकले म्हणाले- आयुष्यात पहिल्यांदा दोन जोडे चप्पल मिळाले
भर उन्हात विना चप्पल चालणारे हे तिघे देपालपुरचे आहेत. यांना राशन घेण्यासाठी भर उन्हात 5 किमी चालत जावे लागते. मुले गावातील तरुण नेते चिंटू वर्माच्या पेट्रोल पंपवर राशन घेण्यासाठी आले होते. वर्मा यांनी त्यांना पाहीले आणि त्यांना राशन देऊन आपल्या गाडीने घरी सोडले. तिथे गेल्यावर समजले की, यांच्या आईचा मृत्यू झाला आहे. अपघातामुळे वडिलांना चालता येत नाही, घराची जबाबदारी मुलांवर आली आहे. घरातील राशन संपल्यामुळे हे तिघे विना चप्पल भर उन्हात निघाले. या गोष्टीची माहिती समाजसेवक राजेंद्र चौधरी यांना मिळाली, त्यानंतर त्यांनी दुकान उघडून 10 जोडी चप्पल या तिघांच्या घरी पाठवल्या. चप्पल मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर हसू खुलले. ते म्हणाले, आयुष्यात पहिल्यांदा एक नाही तर दोन चप्पल जोडी घालणार. लहान वयात खांद्यावर पडलेल्या जबाबदारीने उन्हालाही मात दिली. मुलांचा व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2) अर्धे कुटुंब गुजरातमध्ये, अर्धे कुटुंब इंदुरमध्ये
इंदुरजवळील रलायता गावातीलया मजुर कुटुंबात सात सदस्य आहेत. वडील अंबाराम मालवीय, आई सुमित्रा बाई, मुली ज्याेत्सना (17), दुर्गा (15), मोनिका (13), मेघा (12) आणि सर्वात लहान मुलगा चंदन (10 वर्षे). 2 वर्षांपीर्वी हे कुटुंब मजुरी करण्यासाठी गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील साजियावदर गावात गेले होते. लॉकडाउन होण्यापूर्वी चंदन आजारी पडला. त्याच्या उपचारासाठी आई-वडील आणि सर्वात लहान मुलगी मेघा इंदुरच्या एमवाय हॉस्पीटलमध्ये आले. यादरम्यान लॉकडाउन घोषित झाला. यामुळे आई-वडिलांना परत आपल्या मुलींकडे जाता आले नाही. त्या तिघी अल्पवयीन मुली आपल्या आई-वडिलांना भेटण्यास आतुर झाल्या आहेत. त्या तिघींना गुजरातमधून आणण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
'बाहेर जाण्याची परवानगी देणे आमच्या हातात नाही'
नायब तहसीलदार जितेंद्र वर्मा म्हणाले की, मजुर कुटुंबातील तीन मुली गुजरातमध्ये आहेत, पण जिल्ह्यातून बाहेर जाण्याची परवानगी देणे, आमच्या हातात नाही. अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे,त्यांच्या आदेशानुसार काम केले जाईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.