आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Epidemic In The Country Will End By February; For The First Time, The Government Acknowledged The Spread Of Communicable Infections

केंद्रीय समितीचा मोठा दावा...:देशात कोरोना महामारीचा फेब्रुवारीपर्यंत होणार शेवट; सामुदायिक संसर्गाचा फैलाव झाल्याचे सरकारने प्रथमच केले मान्य

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...पण दुसरी लाट केव्हा येणार हे समितीचे दुसरे मॉडेल सांगू शकले नाही
  • थंडीत दुसऱ्या लाटेची शक्यता, केंद्रीय समितीचा इशारा
  • महामारीचा शेवट होईपर्यंत 1.06 कोटींना होणार संसर्ग

देशात कोरोनाची सर्वोच्च पातळी सप्टेंबरमध्येच आली होती, फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोनाचा शेवट होईल. सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या नॅशनल सुपरमॉडेल समितीने रविवारी हा दावा केला. या समितीत आयआयटी हैदराबाद आणि कानपूरसहित अनेक प्रतिष्ठित संस्थांचे तज्ज्ञ आहेत. दुसरीकडे, थंडीत कोरोनाचाी दुसरी वाट येऊ शकते, त्यामुळे जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असा इशारा महामारीवर नियंत्रणासाठी स्थापन टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिला. दरम्यान, देशात सामुदायिक संसर्ग झालेला आहे, असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मान्य केले, पण हा फैलाव फक्त काही जिल्हे आणि काही राज्यांपुरताच मर्यादित आहे, असे ते म्हणाले.

...पण दुसरी लाट केव्हा येणार हे समितीचे दुसरे मॉडेल सांगू शकले नाही

एक जूनला ‘नॅशनल सुपर मॉडेल फॉर कोविड-19 प्रोग्रेशन’ नावाचा प्रकल्प सुरू झाला होता. त्यात वैज्ञानिकांना प्रत्यक्ष डेटाच्या आधारावर गणिती आणि सांख्यिकी मॉडेल विकसित करून पूर्वानुमान व्यक्त करायचे होते. समितीचे सदस्य प्रा. महेंद्र अग्रवाल म्हणाले की,कोरोनाची अँटिबॉडी शरीरात किती दिवस राहते याची सध्या कुठलीही माहिती नाही. त्यामुळे दुसरी किंवा तिसरी लाट केव्हा येईल याचा अंदाज या मॉडेलद्वारे लावता आला नाही. डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या की, कोरोनावर नियंत्रण मिळवले तरीही लसीचे महत्त्व कमी होणार नाही.

महामारीचा शेवट होईपर्यंत १.०६ कोटींना होणार संसर्ग

> समितीचे अध्यक्ष हैदराबाद आयआयटीचे प्रा. विद्यासागर म्हणाले की, फेब्रुवारीत महामारी नगण्य स्तरावर पोहोचेल. तोपर्यंत देशात १.०६ कोटी लोकांना संसर्ग झालेला असेल.

> बिहारमध्ये निवडणूक, बंगालमध्ये दुर्गापूजेदरम्यान रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मात्र, थंडी संपताच संसर्गही कमी होईल.

लॉकडाऊन नसता तर २५ लाख मृत्यू झाले असते

> समितीने लॉकडाऊनमुळे मजुरांच्या स्थलांतराच्या परिणामाचेही विश्लेषण केले. लॉकडाऊन लागला नसता तर जूनमध्ये सर्वोच्च स्तर असता आणि १.४ कोटींपेक्षा जास्त रुग्ण असते, पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत २.४ कोटी लोक संक्रमित असते. निर्बंध लावले नसते तर ऑगस्टपर्यंत २५ लाख मृत्यू झाले असते.

तज्ज्ञ म्हणाले- प्रदूषण कोरोनाचा प्रसार करेल

प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने होईल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञ म्हणाले की, ज्यांना काही आठवड्यांपूर्वी संसर्ग झाला होता त्यांना यामुळे सर्वाधिक धोका आहे. अनलॉक झाल्याने आणि थंडीची चाहूल लागल्याने दिल्ली-एनसीआरची हवेची गुणवत्ता खराब होत आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

भारत बायोटेक तयार करत आहे नाकाद्वारे दिली जाणारी लस :

हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने वॉशिंग्टन विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठासोबत नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीच्या (नेझल व्हॅक्सिन) चाचणीसाठी एक करार केला आहे. त्याअंतर्गत कंपनी चाचणी, उत्पादन आणि कोविड-19 लसीसाठी बाजाराचा शोध घेईल.

बातम्या आणखी आहेत...