आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात साेमवारी सलग तिसऱ्या दिवशी काेराेनाचे पाच हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळले. सर्वाधिक १८०१ रुग्ण केरळमध्ये आहेत. परंतु नवीन लाटेसारखा धाेका नाही, असे महामारीतज्ज्ञांनी म्हटले आहे. कारण संसर्ग आेमायक्राॅनच्या सबव्हेरिएंटने हाेऊ लागला आहे. तो वेगाने पसरत असला तरीही रुग्णालयात दाखल हाेणाऱ्यांची संख्या वाढली नाही. संसर्गाची तीव्रता खूप कमी झाल्याचे तज्ज्ञांना वाटते. संसर्गानंतर रुग्ण दाेन दिवसांपेक्षा जास्त आजारी पडत नाही. त्यादृष्टीने पाहिल्यास सामान्य ज्वराहूनदेखील ताे क्षीण आणि कमी घातक आहे. ९५ टक्के रुग्णांत लक्षणेही दिसत नाहीत. ५ टक्के रुग्ण आजारी पडत आहेत. साेमवारी देशभरात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. त्यांना गंभीर आजार हाेता.
सक्रिय रुग्णांची संख्या ३५,२७९
देशात सक्रिय रुग्ण वाढून ३५,१९९ झाले. केरळमध्ये सर्वाधिक १२,४३३ सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र-४६६७, दिल्ली २४६०, गुजरात २०१३, तामिळनाडू १९०० रुग्ण आहेत. या राज्यांतील सक्रिय रुग्ण वाढू लागले.
नवीन रुग्णवाढ अशी संसर्ग 10 एप्रिल 5,880 61.5% 1 आठवड्यापूर्वी 3,641 101.7% 2 आठवड्यांपूर्वी 1,805 24.0%
संक्रमण दरवाढीचा वेग
10 एप्रिल 4.0%
1 आठवड्यापूर्वी 2.7%
2 आठवड्यांपूर्वी 1.5%
{संसर्ग दराला ५ टक्क्यांहून जास्त धाेकादायक मानले जाते. दिल्ली, केरळ, महाराष्ट्र इत्यादी राज्यांत हा दर १० टक्क्यांहून जास्त झाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांत निम्मी घट
मुंबई | राज्यात सोमवारी ३२८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडून एका मृत्यूची नोंद झाली. २४ तासांमध्ये रुग्णांच्या संख्येत निम्मी घट झाली. रविवारी ७८८ रुग्ण आणि एका मृत्यू झाला होता. राज्यात सध्या ४६६७ सक्रिय रुग्ण आहेत.
दिव्य मराठी एक्स्पर्ट
डाॅ. विवेक नांगिया,
श्वसनरोगतज्ज्ञ, मॅक्स, दिल्ली
रुग्ण वाढू शकतील, पण गंभीर आजार नाही
आता लाेकसंख्येत महामारीशी लढण्याची शक्ती खूप जास्त वाढली आहे. काही गाेष्टी स्पष्ट आहेत. दहापैकी केवळ एका रुग्णात ताप किंवा इतर लक्षणे दिसतात. कारण बहुतांश लाेकांतील अँटिबाॅडी व्हायरसला निष्क्रिय करत आहे. त्यालाच संसर्गातून येणारी हर्ड इम्युनिटी म्हटले जाते. ही ९० टक्के लाेकसंख्येत आहे. अशा प्रकारे लसीतून हायब्रिड इम्युनिटी विकसित झाली. विषाणूचा परिणाम झाला तरी ताप, खाेकला, अंगदुखीसारखी लक्षणे दाेन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.