• Home
  • National
  • what you should know about corona virus stages which stage is India at with 4 easy example

कोरोना गाइड / तिसऱ्या स्टेजमध्ये कोरोना, जाणून घ्या कसा स्टेज बदलत पसरतो जीवघेणा विषाणू

  • केरळ आणि भारताच्या काही भागात कोरोना तिसऱ्या स्टेजमध्ये पोहोचला आहे.

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 24,2020 09:39:00 AM IST

केरळ आणि भारताच्या काही भागात कोरोना तिसऱ्या स्टेजमध्ये पोहोचला आहे. कसा पोहोचला या स्टेजमध्ये, नवांकुरच्या उदाहरणातून जाणून घ्या काय असतात या स्टेज आणि कशा वाढतात-


पहिली स्टेज - नवांकुर परदेशातून आला. विमानतळावर त्याला ताप नव्हता. त्याला घरी जाऊ दिले. त्याने विमानतळावर शपथपत्र लिहून दिले की, तो १४ दिवस आपल्या घरातच थांबेल आणि ताप आल्यास या क्रमांकावर संपर्क करेल. घरी जाऊन त्याने शपथपत्रातील नियमांचे पालन केले. तो घरातच थांबला. घरातील लोकांपासूनही लांबच राहिला.नवांकुरच्या आईने सांगितले की, अरे तुला काहीच झालेले नाही. वेगळा राहू नको. एवढ्या दिवसांनी घरचे जेवण मिळेल, ये किचनमध्ये. मी गरम गरम वाढते. नवांकुरने नकार दिला. दुसऱ्या दिवशी आई पुन्हा तेच म्हणाली. नवांकुरने नकार दिला. नवांकुर इतरांपासून वेगळे राहणे सुरूच ठेवले. ६-७ व्या दिवशी नवांकुरला सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसू लागली. नवांकुरने हेल्पलाइनवर फोन केला. कोरोना चाचणी केली. तो पॉझिटिव्ह निघाला.त्याच्या घरातील लोकांची तपासणी केली. ते सर्व निगेटिव्ह निघाले. शेजारी १ किमी परिसरात सर्वांची चौकशी केली. सर्व लोकांची चाचणी करण्यात आली. सर्वांनी सांगितले की, नवांकुरला घराबाहेर कोणीच पाहिले नव्हते. त्याने स्वत:ला व्यवस्थित वेगळे ठेवले यामुळे त्याच्यापासून कोणालाच कोरोना झाला नाही. नवांकुर तरुण होता. कोरोनाची लक्षणे किरकोळ होती. केवळ ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी इत्यादी. ७ दिवसांच्या उपचारानंतर तो ठणठणीत होऊन रुग्णालयातून घरी परतला.ज्या आईला आधी वाईट वाटले हाेते, ती आज धन्यवाद देतेय की घरात कोणाला कोरोना झाला नाही. हा पहिला टप्पा ज्यात केवळ परदेशातील आलेल्या व्यक्तीला कोरोना आहे. त्याने कोणालाच होऊ दिला नाही.


दुसरी स्टेज : राजू कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्याला त्याच्या मागील दिवसांची माहिती विचारण्यात आली. त्यात समजले की, तो परदेशात गेला नव्हता. मात्र, तो अशा व्यक्तीच्या संपर्कात आला जो परदेशातून आला होता. तो दागिन्यांच्या खरेदीसाठी दुकानात गेला होता. दुकानाचा मालक परदेशात फिरून आला होता. मालक परदेशातून आला होता. त्याला विमानतळावर ताप नव्हता. यामुळे त्याला घरी जाऊ दिले. त्याच्याकडूनही शपथपत्र लिहून घेण्यात आले की, तो पुढील १४ दिवस एकदम एकटा राहील आणि घरातून बाहेर निघणार नाही. कुटुंबीयांपासून लांब राहील. मालकाने विमानतळावर लिहून दिलेल्या शपथपत्राचे उल्लंघन केले. घरात तो सर्वांना भेटला. संध्याकाळी आपली आवडती भाजी खाल्ली. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या दागिन्यांच्या दुकानावर गेला. ६व्या दिवशी त्याला ताप आला. त्याच्या घरच्यांनाही ताप आला. घरात म्हातारी आई देखील होती. सर्वांची तपासणी झाली. तपासणीत सर्व पॉझिटिव्ह निघाले. म्हणजे परदेशातून आलेल्या दुकानदारो घरातील लोकांना पॉझिटिव्ह केले. त्याशिवाय तो दुकानात ४५० लोकांच्या संपर्कात आला. जसे नोकर, गिऱ्हाईक इत्यादी. त्यातील एक गिऱ्हाईक राजू होता. सर्व ४५० लोकांची तपासणी होतेय. जर त्यातील कोणी पॉझिटिव्ह निघाले तर ही दुसरी पातळी आहे. या ४५० पैकी प्रत्येक जण कोठे कोठे गेला असेल ही भीती आहे. पातळी दोन म्हणजे जी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली ती परदेशात गेलेली नव्हती. मात्र, ती अशा व्यक्तीच्या संपर्कात आली होती जी नुकतीच परदेशातून आली होती.


तिसरी स्टेज : रामसिंगला सर्दी, खोकला, तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तो कोरोना पाॅझिटिव्ह निघाला. मात्र, रामसिंग कधीच परदेशात गेला नव्हता.तसेच तो नुकताच परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आला नव्हता. म्हणजे आपल्याला तो स्रोत माहीत नाही की रामसिंगला कोरोना अखेर झाला कसा?


स्टेज 1 मध्ये व्यक्ती स्वत: परदेशातून आला होता.

स्टेज 2 मध्ये माहीत होते की, स्रोत मालक आहे. आम्ही मालक आणि त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी केली आणि त्यांना १४ दिवसांसाठी वेगळे केले.

स्टेज 3 मध्ये आपल्याला स्रोत माहीत नाही तर मग आपण त्याला वेगळे करू शकत नाही. तो स्रोत कोठे असेल आणि अजाणते त्याने किती लोकांना संसर्ग करेल.

स्टेज 3 कसा होईल?

दुकानदार पाॅझिटिव्ह असल्याचे वृत्त पसरले तसेच ते सर्व ग्राहक, नोकर, घराशेजारचे, दुकानाच्या शेजारचे, दूधवाला, भांडीवाली, चहावाला.... सर्व रुग्णालयात धावले. सर्व मिळून ४४० होते. १० लोक अजूनही सापडलेले नाहीत.पोलिस व आरोग्य विभागाचे पथक त्यांचा शोध घेत आहे. त्या दहापैकी जर कोणी मंदिर किंवा इतरत्र गेला तर हा विषाणू चांंगलाच पसरेल. हाच टप्पा ३ आहे जो तुम्हाला स्रोत माहिती नाही.


स्टेज 3 चा उपाय

१४ दिवसांसाठी लॉकडाऊन कर्फ्यू लागू करा. कोणालाच बाहेर निघू देऊ नका. या लॉकडाऊनने काय होईल? प्रत्येक जण घरात बंद आहे. जो संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला नाही तो सुरक्षित आहे. जो अज्ञात सोर्स आहे तोही आपल्या घरात बंद आहे. तो जेव्हा आजारी होईल तेव्हा रुग्णालयात जाईल आणि तेव्हा समजेल की हाच अज्ञात सोर्स आहे. या अज्ञात सोर्सने आपल्या घरातील चार जणांना संसर्ग केला असेल. मात्र, संपुर्ण शहर वाचले. जर लॉकडाऊन नसते तर तो सोर्सही सापडला नसता आणि हजारो लोकांमध्ये कोरोना पसरला असता.


स्टेज २, स्टेज ३ मध्ये रूपांतरित होऊ नये म्हणून काय करायचेे

लवकर लॉकडाऊन म्हणजे स्टेज ३ येण्याआधीच टाळेबंदी करावी. ती कमीत कमी १४ दिवस असावी. उदाहरणासाठी- दुकानदार विमानतळावरून निघाला, त्याने नियमांची पायमल्ली केली. पूर्ण कुटुंबाला कोरोना दिला. सकाळी उठून दुकान उघडले. मात्र, लॉकडाऊन असल्याने पोलिस त्याच्या दुकानात काठी घेऊन गेले. बंद असल्याने ४५० गिऱ्हाईकही आले नाहीत, सर्व वाचले.

X