आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The Last 24 Hours, 2528 People Have Contracted Corona In The Country The Number Of Active Patients Has Crossed 29,000

कोरोना अपडेट:गेल्या 24 तासांत देशात 2528 जणांना कोरोनाची लागण, सक्रिय रूग्णांची संख्या 29 हजारांपार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत 12 ते 14 वर्षे वयोगटातील 8.21 लाख मुलांना अँटी-कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे 4.6 लाख डोस देण्यात आले आहे.

भारतात एका दिवसात कोरोना विषाणूचे 2,528 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4,30,04,005 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 29,181 वर आली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात संसर्गामुळे आणखी 149 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 5,16,281 वर येऊन पोहोचली आहे. देशात कोरोना वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 29,181 आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.07 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1,618 ने घट झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4,24,58,543 लोक संसर्गमुक्त झाले असून, कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के आहे. त्याच वेळी, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 180.97 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर आजारही होते.

देशात 7 ऑगस्ट 2020 रोजी संक्रमितांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांवर गेली होती. मात्र, 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली.19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी कोरोना बाधितांचा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला होता. तसेच 23 जून 2021 रोजी तीन कोटींच्या पुढे गेला होता. यावर्षी २६ जानेवारीला प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती.

दरम्यान 15 ते 18 वर्षे वयोगटातील नागरिकांना एकूण 9.14 कोटी डोस देण्यात आले, तर लसीचे 2,16,24,841 डोस आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना खबरदारीचा डोस (बूस्टर) म्हणून देण्यात आले. भारतात कोविड या विषाणू पासुन संरक्षण करण्यासाठी लसीकरण गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी आरोग्य कर्मचार्‍यांसह सुरू झाले, ज्याची व्याप्ती हळूहळू वाढविण्यात आली आणि उर्वरित लोकसंख्येचाही समावेश करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...